Dailyhunt
May Festival List: मे महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची संपूर्ण यादी जाणून घ्या

May Festival List: मे महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची संपूर्ण यादी जाणून घ्या

  • मे महिन्यात येणाऱ्या संपूर्ण सण उत्सवांची यादी
  • मे महिन्यातील सण उत्सव

हिंदू पंचांगानुसार मे महिना अध्यात्मिकरित्या खूप महत्त्वाचा मानला जातो. एप्रिल महिना संपून मे महिन्याच्या सुरुवातीलाच व्रतवैकल्य येत आहे.

या महिन्यात वैशाख महिन्याची समाप्ती होणार आहे आणि ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे. ज्यामुळे धार्मिक विधींना महत्व प्राप्त झाले आहे. हा काळ पूजा अर्चना, उपवास आणि धार्मिक विधींसाठी शुभ आणि फायदेशीर मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी काही प्रमुख व्रत आणि सण येत आहेत. त्यामुळे व्यक्तींच्या जीवनात सकारात्मकता येणार आहे. हा महिना धर्म, भक्ती आणि साधना यांच्याशी संबंधित असलेला महिना आहे.

ज्येष्ठ महिन्याला जास्त महत्व का आहे

ज्येष्ठ महिन्यामध्ये गंगाधर शहरा, निर्जला एकादशी, ज्येष्ठ पौर्णिमा आणि योगिनी एकादशी यांसारखे धार्मिक व्रत पाळले जातात. यांचे महत्व जीवनामध्ये नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता आणते. यावेळी लोक धार्मिक ठिकाणी स्नान करतात आणि गरजूवंतांना दान करतात. उन्हाळ्यामध्ये मानवच नाही तर पक्षुपक्षी तहानलेले असतात त्यामुळे त्यांच्यासाठी पाण्याची विशेष सोय करणे फायदेशीर मानले जाते.

सण-उत्सवांची यादी

शुक्रवार, 1 मे बौद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा

वैदिक पंचांगानुसार, पौर्णिमेची सुरुवात ३० एप्रिल रोजी रात्री ९:१२ वाजता होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती १ मे रोजी रात्री १०:५२ वाजता होणार आहे. त्यामुळे, वैशाख पौर्णिमा १ मे रोजी साजरी केली जाईल.

शनिवार 2 मे नारद जयंती

नारद जयंती ही ब्रह्मदेवाचे मनोपुत्र आणि भगवान विष्णूचे महान भक्त देवर्षी नारद यांची जयंती आहे, जी सहसा ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा/द्वितीय तिथीला साजरी केली जाते.

समर्थ रामदास स्वामींचे "मनाचे श्लोक": एका रात्रीत घडलेली अद्भुत काव्यनिर्मिती, जाणून घ्या प्रेरणादायी कथा

मंगळवार 5 मे अंगारकी संकष्टी चतुर्थी

हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला “संकष्टी चतुर्थी” म्हटले जाते, ज्याचा अर्थ “संकट दूर करणारी चतुर्थी” असा होतो. मेमधील ही चतुर्थी आणखी विशेष आहे कारण ती मंगळवारी येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला “अंगारकी संकष्टी चतुर्थी” म्हटले जाते.

शनिवार 9 मे मासिक कालाष्टमी

मासिक कालष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा मासिक उपवास आहे, जो भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित असून, दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला पाळला जातो.

मंगळवार 12 मे हनुमान जयंती

बुधवार 13 मे परशुराम द्वादशी, अपरा एकादशी

अपरा एकादशीचा उपवास ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो. ही तिथी १२ मे रोजी दुपारी २:५२ वाजता सुरू होते आणि १३ मे रोजी दुपारी १:२९ वाजता संपते. त्यामुळे, अपरा एकादशी १३ मे रोजी पाळली जाईल.

गुरुवार 14 मे गुरु प्रदोष व्रत

गुरु प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित एक अत्यंत शुभ व्रत आहे, जे गुरुवारी, त्रयोदशी तिथीला (शुक्ल किंवा कृष्ण पक्ष) येते. हे व्रत शत्रूंवर विजय, ज्ञानप्राप्ती आणि इच्छित फळ मिळवण्यासाठी पाळले जाते.

शुक्रवार 15 मे वृषभ संक्रांति, मासिक शिवरात्र

शुक्रवार, १५ मे रोजी वृषभ संक्रांती आहे, जेव्हा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. ही वैशाख महिन्याची संक्रांती असून, ती आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे आणि याच दिवशी मासिक शिवरात्रीचे देखील व्रत पाळले जाणार आहे.

शनिवार 16 मे शनी जयंती, वैशाख अमावस्या

16 एप्रिल रोजी वैशाख अमावस्या साजरी केली जाईल. या दिवशी स्नान करणे, दानधर्म करणे आणि पूर्वजांची प्रार्थना करणे याला विशेष महत्त्व आहे. या पवित्र दिवशी सूर्यदेवाची प्रार्थना करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Vaishakh Purnima 2026: वैशाख पौर्णिमेचे काय आहे धार्मिक महत्त्व, हे व्रत पाळल्याने कोणते होतात फायदे

सोमवार 17 मे रोहिणी व्रत, ज्येष्ठ महिन्याची सुरुवात

सोमवार 17 मेपासून ज्येष्ठ महिन्याची सुरुवात सुरुवात होत आहे. यावेळी अधिक मास आहे.

मंगळवार 19 मे विनायक चतुर्थी

मे महिन्यात विशेषतः मंगळवार, १९ मे रोजी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची विनायक चतुर्थी येत आहे. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते.

गुरुवार 21 मे स्कंद षष्ठी

स्कंद षष्ठी हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा ज्येष्ठ पुत्र, भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. जो दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला पाळला जातो.

शनिवार, 23 मे मासिक दुर्गाष्टमी

मासिक दुर्गाष्टमी हा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला देवी दुर्गाला समर्पित केलेला पवित्र व्रत आहे.

बुधवार 27 मे पद्मिनी एकादशी

पद्मिनी एकादशी, जिला कमला किंवा पुरुषोत्तमी एकादशी असेही म्हणतात, ही हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिक मास’च्या शुक्ल पक्षात साजरी केली जाते.

गुरुवार 28 मे गुरु प्रदोष व्रत

रविवार 31 मे ज्येष्ठ पौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमा ही हिंदू धर्मातील एक पवित्र तिथी असून, या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra