Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Medical Colleges: मेडिकल कॉलेजेसमध्ये आता सीसीटीव्हीची कडक देखरेख; निष्काळजीपणा करणाऱ्या संस्थांवर का होणार कारवाई?

Medical Colleges: मेडिकल कॉलेजेसमध्ये आता सीसीटीव्हीची कडक देखरेख; निष्काळजीपणा करणाऱ्या संस्थांवर का होणार कारवाई?

NMC CCTV Guidelines Medical Colleges: जर तुमचे मेडिकल कॉलेज (वैद्यकीय महाविद्यालय) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नियमांचे पालन करत नसेल, तर आता त्यांच्या अडचणी वाढू शकतात. आयोगाने अशा ७० मेडिकल कॉलेजेस आणि संस्थांची ओळख पटवली आहे, ज्यांनी अद्याप अनिवार्य सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे आणि देखरेख यंत्रणेशी संबंधित नियम पूर्ण केलेले नाहीत.

एनएमसीने या सर्व संस्थांना तातडीने नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

एनएमसीने जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व मेडिकल कॉलेजेसना ठरवून दिलेल्या मानकांनुसार (Standards) कॅम्पसमध्ये २५ सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतील. यासोबतच नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर (NVR) बसवणे आणि किमान ३० दिवसांपर्यंत कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवणेही बंधनकारक आहे. इतकेच नाही तर, कॉलेजेसना त्यांच्या एनव्हीआरची फीड आयोगासोबत शेअर करावी लागेल.

आयोगाने स्पष्ट केले की हा कोणताही नवीन नियम नाही. हे निर्देश यापूर्वीही विविध नियम आणि अधिसूचनांद्वारे जारी करण्यात आले आहेत. यामध्ये यूजी मेडिकल एज्युकेशन स्टँडर्ड रेग्युलेशन्स (UGMSR-2023), पीजी मेडिकल एज्युकेशन स्टँडर्ड रेग्युलेशन्स (PGMSR-2023 दुरुस्ती) आणि एमएआरबी रेग्युलेशन्स-२०२३ चा समावेश आहे. असे असूनही अनेक मेडिकल कॉलेजेस अद्याप त्यांचे पालन करू शकलेले नाहीत.

FMGE June 2026 Result: परदेशातून MBBS केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; एफएमजीई जून परीक्षेचा निकाल जाहीर!

NMC ने काय म्हटले आहे?

एनएमसीच्या मते, ज्या संस्थांनी अजूनही आपली सीसीटीव्ही यंत्रणा आणि एनव्हीआर आयोगाशी जोडलेले नाहीत, त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्यात आला होता. अनेकदा आठवण करून देऊनही काही कॉलेजेसनी आवश्यक ती व्यवस्था केली नाही. याच कारणामुळे आता आयोगाने सार्वजनिक नोटीस जारी करून सर्व संस्थांना तातडीने नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

आयोगाचे म्हणणे आहे की, मेडिकल कॉलेजेसमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था ही केवळ औपचारिकता नसून पारदर्शकता आणि देखरेख सुनिश्चित करणारा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे संस्थांमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यास मदत होते आणि नियामक व्यवस्था अधिक बळकट करता येऊ शकते.

School Bandh Andolan: ९ जुलैला राज्यातील शाळा बंद! शिक्षकांचा सामूहिक रजेचा निर्णय; जाणून घ्या नेमका विषय काय?

किती मेडिकल कॉलेजना निर्देष देण्यात आले?

या नोटीसमध्ये अशा ७० मेडिकल कॉलेजेस आणि संस्थांचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या अजूनही निर्धारित मानकांचे पालन करत नाहीत. आयोगाने या संस्थांना कोणतीही दिरंगाई न करता सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, एनव्हीआर स्थापित करणे आणि त्याची फीड शेअर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra