Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mira Bhayandar News: नागरिकांसाठी मोठा दिलासा! ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, गणेश मंडप NOC आणि Pothole ॲपचे लोकार्पण

Mira Bhayandar News: नागरिकांसाठी मोठा दिलासा! ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, गणेश मंडप NOC आणि Pothole ॲपचे लोकार्पण

  • महापौरांच्या वाढदिवसानिमित्त मिरा-भाईंदरकरांना डिजिटल सेवांची भेट
  • तीन नवीन ऑनलाइन सुविधांचे लोकार्पण
  • गणेश मंडप NOC आणि Pothole ॲपचे लोकार्पण
विजय काते, मिरा रोड : नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ नागरी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेने तीन महत्त्वपूर्ण डिजिटल सेवांचा शुभारंभ केला आहे.
शनिवारी (1 ऑगस्ट) आयोजित कार्यक्रमात महापौर डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सेवा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगी (NOC) पोर्टल आणि Pothole Reporting & Repair System या मोबाईल ॲपची सुरुवात करण्यात आली. या सेवांमुळे नागरिकांना अनेक महत्त्वाची कामे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार असून महापालिकेच्या डिजिटल प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे.

ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सेवा

या सेवेद्वारे नागरिकांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, ऑनलाइन शुल्क भरणे आणि प्रमाणपत्र डाउनलोड करणे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.

Mira Bhayandar News: २५ लाखांची उधळपट्टी? स्वतःची वाहने असतानाही झाडांच्या छाटणीसाठी खासगी वाहनांवर महापालिकेचा भर

गणेशोत्सव मंडप परवानगी आता ऑनलाइन

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगी (NOC) पोर्टलमुळे गणेश मंडळांना परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन परवानगी प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे.

खड्ड्यांची तक्रार थेट मोबाईलवरून

Pothole Reporting & Repair System या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिक आता रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार संबंधित ठिकाणाचे छायाचित्र आणि GPS लोकेशनसह नोंदवू शकतील. तक्रारीवर झालेल्या कारवाईची स्थितीही ऑनलाइन पाहता येणार असल्याने दुरुस्ती प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, शहर अभियंता दिपक खांबित, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती हेमा बेलानी, सिस्टम मॅनेजर राज घरत, नगरसेविका दिप्ती भट, हेतल परमार, सुरेखा सोनार, स्नेहा पांडे, रूपाली मोदी, नगरसेवक तरुण शर्मा, विशाल पाटील तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी ऑनलाइन सेवांचा लाभ घ्यावा

यावेळी महापौर डिंपल मेहता यांनी नागरिकांना या सर्व डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. भविष्यातही मिरा-भाईंदर महानगरपालिका नागरिककेंद्रित, तंत्रज्ञानाधारित आणि कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एसटीतून प्रवास करताना सवलतीचा लाभ घेताय? तर आता तुमचंही होणार सर्वेक्षण

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra