Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mira Bhayander : मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद ; सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक

Mira Bhayander : मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद ; सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक

  • मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद
  • सदावर्ते यांना विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे राज ठाकरेंनी केलं कौैतुक
मीरा रोड/ विजय काते : मीरा-भाईंदर शहरात मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून रंगलेल्या वादात गुणरत्न सदावर्ते यांच्या सभेला विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे.
दादर येथील निवासस्थानी सचिन पोफळे व त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेत राज ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेचे अभिनंदन करत शाबासकीची थाप दिली. यावेळी युवराज अमित ठाकरे देखील उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाकडून 1 मेपासून रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर राज्यभरात विविध स्तरांवरून विरोध सुरू झाला असून, काही ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मीरा-भाईंदर शहरात येत रिक्षा चालकांची सभा घेत या निर्णयाला विरोध दर्शवला होता.

KDMC News : डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमिपूजन; महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्याधुनिक जिम सेंटरची होणार उभारणी

मात्र, सदावर्ते यांच्या या भूमिकेविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली. मनसेचे पदाधिकारी सचिन पोफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभास्थळी पोहोचत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसेच्या पाच कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा झाली.

या निदर्शनांदरम्यान संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची दखल घेत मनसे नेते अविनाश जाधव स्वतः नवघर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवला होता.दरम्यान, या संपूर्ण घडामोडींची माहिती घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबंधित कार्यकर्त्यांना दादर येथील आपल्या बंगल्यावर बोलावले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचे कौतुक केले. तसेच अमित ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत अशा प्रकारच्या लढ्यांमध्ये सक्रिय राहण्याचे आवाहन केले.या घटनेमुळे मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काळात या वादाला अधिक तीव्रता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धक्कादायक प्रकार : शासकीय रुग्णालयात १.६५ कोटींची मुदतबाह्य औषधे; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra