Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत 'भाजलेला मका', फार सोपी आहे रेसिपी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत 'भाजलेला मका', फार सोपी आहे रेसिपी

  • पावसाळ्यात बाजारात मके मोठ्या प्रमाणात येतात.
  • या सीजनमध्ये भाजलेला मका खाण्याची मजाच काही न्यारी.
  • हा चटपटीत, स्मोकी भाजलेला मका तुम्ही घरी देखील बनवू शकता.
पावसाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला कोळशाच्या निखाऱ्यांवर भाजलेल्या मक्याचा दरवळ अनेकांना आकर्षित करतो.
बटरमध्ये भाजलेला मका, त्यावर चटकदार मसाले आणि हलका लिंबाचा रस यामुळे याची चव आणखीनच खुलते. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम मका खाण्याची मजाच काही न्यारी. घरीही अगदी त्याच स्ट्रीट स्टाईल पद्धतीने भाजलेला मका तयार करता येतो. योग्य प्रकारे भाजल्यास मक्याला हलकी स्मोकी चव येते. संध्याकाळच्या चहासोबत, पावसाळ्यातील गप्पांमध्ये किंवा हलक्या स्नॅकसाठी ही रेसिपी उत्तम पर्याय ठरते. कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव यामुळे ही रेसिपीतुम्ही एकदा तरी नक्की करून पाहावी.

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत 'टूक', संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

साहित्य

  • 2 ताजे मक्याची कणसे
  • 1 लिंबू
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून काळे मीठ
  • ½ टीस्पून साधे मीठ
  • ½ टीस्पून भाजलेले जिरे पूड
  • ¼ टीस्पून चाट मसाला
  • 1 टीस्पून बटर
नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम मका स्वच्छ धुऊन त्यावरील साल आणि रेशीम पूर्णपणे काढून टाका.
  • गॅसवर जाळी ठेवून मध्यम आचेवर मका सर्व बाजूंनी फिरवत भाजा. दाण्यांवर काळपट डाग पडून ते हलके खरपूस होईपर्यंत भाजत राहा.
  • अधिक स्ट्रीट स्टाईल स्वादासाठी मका अधूनमधून फिरवत समान रीतीने भाजा, जेणेकरून प्रत्येक बाजूला धुरकट फ्लेवर येईल.
  • एका छोट्या वाटीत लाल तिखट, काळे मीठ, साधे मीठ, भाजलेले जिरे पूड आणि चाट मसाला एकत्र मिसळा.
  • लिंबू अर्धे कापून त्यावर तयार मसाला लावा आणि ते लिंबू भाजलेल्या मक्यावर सर्व बाजूंनी चोळा.
  • आवडत असल्यास गरम मक्यावर थोडे बटर लावून पुन्हा हलका मसाला शिंपडा. त्यामुळे चव अधिक समृद्ध होते.
  • गरमागरम स्ट्रीट स्टाईल भाजलेला मका गरमा गरम सर्व्ह करा आणि पावसाळ्यातील खमंग चवीचा आनंद घ्या.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra