Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार 'ब्रेड पकोडा'

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार 'ब्रेड पकोडा'

  • पावासाळ्यात गरमा गरम पदार्थ खाण्याची मजाच न्यारी.
  • ब्रेड पकोडा चवीला फार छान लागतो आणि तो सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे.
  • बाहेरचे पदार्थ या सीजनमध्ये खाऊ नका, तर त्यांना घरीच बनवा.
पावसाळा असो, संध्याकाळचा चहाचा वेळ असो किंवा घरी अचानक पाहुणे आले असोत, झटपट तयार होणाऱ्या आणि सर्वांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये ब्रेड पकोड्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते.
बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा स्वादिष्ट नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या ब्रेड, बेसन आणि काही मसाल्यांच्या मदतीने काही मिनिटांत हा पदार्थ तयार होतो. अनेक ठिकाणी यामध्ये मसालेदार बटाट्याचे सारण भरूनही ब्रेड पकोडा बनवला जातो, तर काहीजण साधा ब्रेड पकोडा अधिक पसंत करतात. गरमागरम हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गोड चिंचेच्या चटणीसोबत याची चव आणखी खुलून येते. चला घरीच चवदार चवीचे ब्रेड पकोडे कसे बनवायचे याची रेसिपीजाणून घ्या.

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत 'भाजलेला मका', फार सोपी आहे रेसिपी

साहित्य

  • 6 ब्रेड स्लाइस
  • 2 कप बेसन
  • 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून हळद
  • ½ टीस्पून धणे-जिरे पूड
  • ¼ टीस्पून ओवा
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ
  • चिरलेली कोथिंबीर
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तळण्यासाठी तेल
गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, ओवा, हिंग, मीठ आणि कोथिंबीर एकत्र करा.
  • या मिश्रणात थोडे-थोडे पाणी घालून गुठळ्या न राहता मध्यम घट्ट असे पीठ तयार करा. हे पीठ 10 मिनिटे झाकून ठेवा.
  • ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसचे दोन त्रिकोणी तुकडे करा. इच्छेनुसार स्लाइस पूर्णही ठेवू शकता.
  • कढईत तेल गरम करा. ब्रेडचे तुकडे तयार बेसनाच्या पिठात सर्व बाजूंनी व्यवस्थित बुडवा.
  • पिठात माखलेले ब्रेडचे तुकडे गरम तेलात सोडा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले ब्रेड पकोडे टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम ब्रेड पकोडे हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गोड चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra