Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट

मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट

  • देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट
  • मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर
  • विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आपल्या नागपूर शहराला एक महत्त्वपूर्ण भेट देणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये एक जागतिक दर्जाचे, बहुद्देशीय कन्वेंशन आणि एक्झीबिशन सेंटर उभारण्याची योजना आखली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना हा भव्य प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्याचे निर्देश दिले आहे. हे सेंटर साकरल्यानंतर नागपूर येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी भव्य ठिकाण उपलब्ध होणार आहे. मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या सेंटरमुळे नागपूरच्या आर्थिक विकासाला, पर्यटनाला, उद्योगाला आणि रोजगाराला लक्षणीय चालना मिळेल. नागपूर विमानतळ परिसरातील विकासाला अनुसरून याचे डिझाईन केले जात आहे. या बांधकामात विमान, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Buldhana News: कर्जमुक्तीची अंमलबजावणी करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक ओळख

कन्वेंशन सेंटर केवळ व्यावसायिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांपुरते मर्यादित राहणार नाही, तर ते नागपुरची सांस्कृतिक ओळख होणार आहे. कन्वेंशन सेंटरची वास्तुकला आकर्षक आणि पर्यावरणपूरक असावी. संपूर्ण इमारतीत ऊर्जा-बचत आणि हरित तंत्रज्ञानाचा (ग्रीन टेक्नॉलॉजी) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश

हा प्रकल्प हॉस्पिटॅलिटी, मीडिया, इव्हेंट मैंनेजमेंट आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांसाठी कुशल तरुण तयार करेल. मुख्यमंत्र्यांनी जमीन हस्तांतरण, निविदा आणि बांधकाम यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया मुदतीत पूर्ण करण्याच्या कडक निर्देश दिले आहे. या महत्त्वाच्या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ठळक वैशिष्ट्ये

  • जागतिक दर्जाचे कन्वेंशन सेंटर उभारण्याची तयारी
  • २०२९ पर्यंत काम सुरू करण्याच्या सूचना
  • सेंटर पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल
  • पर्यटन, उद्योग, रोजगाराला मोठी चालना मिळेल
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल
  • विमान, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर विशेष लक्ष देण्यावर भर

Buldhana News: कपाशीपेक्षा सोयाबीनचाच दबदबा, राज्यात सर्वाधिक ३७.८% क्षेत्र व्यापले, सरासरी ८२ टक्के पेरणी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra