Friday, 22 Jan, 2.09 pm नवराष्ट्र

होम
मुंबई | एकनाथ खडसेंना अटक करण्याची घाई कशासाठी? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर खडसे हे चौकशीसाठी हजर झाले होते. तरीही, त्यांच्या अटकेसाठी घाई का केली जात आहे, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. एकनाथ खडसेंना काही दिवस अटकेपासून संरक्षण दिले, तर काय आभाळ कोसळणार आहे, अशा शब्दात न्यायालयाने खडसेंना अटक करण्याबाबत होत असलेल्या घाईचा समाचार घेतलाय.

भोसरीतील जमीन व्यवहार प्रकरणात ईडीनं एकनाथ खडसेंना नोटीस बजावलीय. याप्रकरणी अटकेची कारवाई कऱण्यात येऊ नये आणि आपल्याविरोधातील केस मागे घ्यावी, या मागण्या करत खडसेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत झालेल्या सुनावणीच्या वेळी खडसेंना अटक केली नाही, तर काय आभाळ कोसळणार आहे का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केलाय.

भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर खडसे हे चौकशीसाठी हजर झाले होते. तरीही, त्यांच्या अटकेसाठी घाई का केली जात आहे, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. एकनाथ खडसेंना काही दिवस अटकेपासून संरक्षण दिले, तर काय आभाळ कोसळणार आहे, अशा शब्दात न्यायालयाने खडसेंना अटक करण्याबाबत होत असलेल्या घाईचा समाचार घेतलाय.

न्यायव्यवस्था, आरबीआय, सेबी, रिझर्व्ह बँक, ईडी यासारख्या यंत्रणांनी निष्पक्षपातीपणे काम करायला हवे. केंद्रीय यंत्रणांनी सरकारी दबावाखाली काम केल्यास ते देशाच्या लोकशाहीसाठी हितावह ठरणार नाही, असा शेरादेखील मुंबई उच्च न्यायालयाने लगावलाय.

हे सुद्धा वाचा

न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर खडसेंच्या याचिकेवर सुनावणी झाली. याचिका प्रलंबित असेपर्यंत खडसेंना अटकेसारख्या कारवाईपासून संरक्षण देण्याची विनंती खडसेंचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top