महाराष्ट्र
मुंबई | माहिती अधिकारातून मिळणाऱ्या माहितीसाठी हमीपत्राची मागणी

माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागविणाऱ्या अर्जदाराला माहितीचा गैरवापर करणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्यास सांगण्यात आले आहे. कायद्यात अशा प्रकारचे हमीपत्र लिहून देण्याची तरतूद नसल्याने याबाबत अर्जदार राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांकडे धाव घेणार आहे. अर्जदार शेखर सावंत यांनी गोरेगाव येथील यशोधाम हायस्कूल विषयीची माहिती अधिकारकायद्यातंर्गत पालिकेच्या शिक्षण विभागाकडे माहिती मागविली होती.
- अर्जदाराची मुख्य माहिती आयुक्तांकडे धाव
मुंबई (Mumbai). माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागविणाऱ्या अर्जदाराला माहितीचा गैरवापर करणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्यास सांगण्यात आले आहे. कायद्यात अशा प्रकारचे हमीपत्र लिहून देण्याची तरतूद नसल्याने याबाबत अर्जदार राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांकडे धाव घेणार आहे. अर्जदार शेखर सावंत यांनी गोरेगाव येथील यशोधाम हायस्कूल विषयीची माहिती अधिकारकायद्यातंर्गत पालिकेच्या शिक्षण विभागाकडे माहिती मागविली होती.
विनाअनुदानिता शाळा सार्वजनिक प्राधिकरण संस्थेत बसत नसल्याने या शाळेला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही असे पालिकेच्यावतीने कळविण्यात आले होते. मात्र अर्जदाराचे समाधान न झाल्याने अपिलीय अधिकारीच्या समोर याप्रकरणाची प्रथम सुनावणी पार पडली. यावेळी अर्जदाराने सदर शाळेची माहिती कशासाठी मागविली आहे याचा उल्लेख नसल्याने पालिकेकडून मिळालेल्या शाळेच्या माहितीची गैरवापर करणार नाही असे हमीपत्र देण्यास सांगण्यात आले असल्याचे अर्जदारांचे म्हणणे आ हे. यामुळे अर्जदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याविराेधात मुंबईतील माहिती अधिकारी कार्यकर्ते यांनीही राेष व्यक्त केला आ हे. तर अर्जदार यांनी मुख्य माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.