Sunday, 24 Jan, 8.50 pm नवराष्ट्र

होम
मुंबई | राज्यात २,७५२ नवीन कोरोना रुग्णांची नाेंद, राज्यात ४५ कोराेनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात रविवारी २७५२ नवीन काेराेना रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे. तर आज १,७४३ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,१२,२६४ कराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. ज्यामुळे राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९५.१८% एवढे झाले आहेत. राज्यात आज ४४,८३१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील आठवड्याभरापासून राज्यात काेराेना रुग्णसंख्या स्थिर असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. राज्यात काेराेना मृत्यूदरही कमी झाला असल्याचे आराेग्य विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगतात.

मुंबई (Mumbai). राज्यात रविवारी २७५२ नवीन काेराेना रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे. तर आज १,७४३ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,१२,२६४ कराेना बाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. ज्यामुळे राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९५.१८% एवढे झाले आहेत. राज्यात आज ४४,८३१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील आठवड्याभरापासून राज्यात काेराेना रुग्णसंख्या स्थिर असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. राज्यात काेराेना मृत्यूदरही कमी झाला असल्याचे आराेग्य विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगतात.

राज्यात आज ४५ कराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४५ मृत्यूपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

हे १८ मृत्यू अहमदनगर-६, औरंगाबाद- ५, नागपूर-४, अमरावती-१, बीड-१ आणि वाशिम-१ असे आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४२,०७,५९५ प्रयाेगशाळा नमुन्यांपैकी २०,०९,१०६ (१४.१४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,९९३ व्यक्ती हाेमक्वारंटाईन असून २,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top