Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४

मुंबईतील ९० टक्के रिक्षा थांबे गायब! संपूर्ण शहरात २.६० लाख रिक्षा, १८ हजार टॅक्सी; पण थांब्यांची संख्या फक्त ७२४

मुंबई परिवहनमंत्र्यांनी रिक्षा, टॅक्सी चालकांना व्यवहारार्थ मराठी निर्णय जाहीर केल्यानंतर आता सरकारविरोधात रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर, दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरातील काळया-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा उभ्या करण्यासाठी असलेल्या थांब्याची संख्या खूपच अपुरी असल्याने चालकांची गैरसोय होत आहे.

त्यामुळे सरकारने मराठी सक्ती केली पण, रिक्षा, टॅक्सी चालकांच्या गैरसोयीकडे सरकार कधी लक्ष देणार? असा सवाल वाहतूक संघटनांनी विचारला आहे.(फोटो सौजन्य - AI)

"महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…"; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईत सध्या अनेक प्रकल्प सुरू असून, या प्रकल्पांसाठी अनेक ठिकाणी रिक्षा टॅक्सी थांबे हटवण्यात आले. परंतु, काढलेले थांबे पुन्हा सुरू झालेले नाहीत. शहरात सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी टॅक्सीकरिता सुमारे दोन हजार, तर रिक्षांसाठी जवळजवळ १,८०० थांबे होते. त्यावेळी रिक्षा-टॅक्सीची संख्या कमी असल्याने उपलब्ध थांबे चालकांसाठी पुरेसे होते. परंतु काळाच्या ओघात मुंबईची लोकसंख्या वाढली त्यासोबतच रिक्षा-टॅक्सीची संख्या देखील. परंतु, त्या तुलनेत थांब्याच्या संख्येत वाढ न होता कमी होत गेली. सध्या मुंबईमध्ये सुमारे १८ हजार टॅक्सी तर, नोंदणीकृत सुमारे २ लाख ६० हजार रिक्षा आहेत. त्यामुळे आज घडीला शहरातील रिक्षा, टॅक्सींची संख्या पाहता थांबे पूर्ववत करुन संख्या वाढविण्याची मागणी संघटना आणि चालकांकडून होत आहे.

सध्या रेल्वे स्टेशन टॅक्स स्टैंड आहेत, त्याना परिवहन विभाग वाहतूक पोलिस आणि पालिका यांची परवानगी मिळाली आहे. मात्र रेल्वे हे रिक्षा, स्टॅक्सी स्टैंड अनधिकृत असल्याचे म्हणते. एखाद्या कामासाठी एखाद्या मॉल, इमारत किंवा हॉटेल समोरील रिक्षा टॅक्सी स्टैंड हटवण्यात आला तर, या खासगी आस्थापना देखील तिचे पुन्हा रिक्षा टॅक्सी स्टैंड सुरू करण्याला मनाई करतात. रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी कोणतेच सरकार मदतीला येत नाही, असे मत के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप टॅक्सी रिक्षा आधाडी सेल यांनी व्यक्त केले आहे.

ST Bus News : एसटीच्या डिझेल बचत योजनेला अर्थ खात्याचा अडथळा; गुजरातहून खरेदीस नकार

मुंबईतील रिक्षा, टॅक्सी थांब्यांची संख्या कमी झाल्याने चालकांची परवड होत आहे. पूर्वी जिथे थांबा होता त्याच ठिकाणी वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिस गाडीवर कारवाई करतात, दुपारच्या वेळेस विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केल्यासही वाहतूक पोलिस दंड आकारतात. तर, उरलेल्या टॅक्सी थांब्याची जागा खासगी वाहनांनी व्यापलेली असते. शहरातील ९० टक्के रिक्षा थांबे हटविण्यात आले असून, चालक प्रवासी घेण्यासाठी उभे राहिल्यास वाहतूक पोलिस कारवाई करत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra