Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

ल्हारपेठ : आज दिवसभर ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने मल्हारपेठ परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे दुपारनंतरच्या मोठ्या पावसाने निसरे फाटा, परिसरातील सखल भाग जलमय झाले. अनेक घरांमध्ये आणि दुकानगाळ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

निसरे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच निसरे गाव व मल्हारपेठ परिसरातील अनेक रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी वाहनचालकांना वाहने थांबवावी लागली, तर पादचाऱ्यांचीही गैरसोय झाली.

घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे धान्य, किराणा सामान, फर्निचर, विद्युत उपकरणे तसेच इतर घरगुती वस्तूंचे नुकसान झाले. दुकानगाळ्यांमध्येही पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मालाचे नुकसान झाले असून पावसामुळे दिवसभर व्यापारावर परिणाम झाला.

Satara Water Supply : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नाले व गटारे तुडुंब भरून वाहू लागले. पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून मदत द्यावी तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निसरे फाटा रहिवाशी करत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra