पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं झटपट तयार होणारे गरमागरम पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. सूप, वेगवेगळ्या पालेभाज्या आणि कुरकुरीत पदार्थ अतिशय आवडीने खाल्लेले जातात. जेवणाच्या ताटात कायमच डाळभात किंवा चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते.
अशावेळी तुम्ही दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत टोमॅटो सार बनवून खाऊ शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. फोडणीचा सुगंध, टोमॅटोचा ताजेपणा आणि मसाल्यांचा हलका स्वाद जेवणाची चव वाढवतो. त्यामुळे जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर झटपट तुम्ही गरमागरम टोमॅटोचा सार आणि भात खाऊ शकता. लहान मुलांसह मोठेसुद्धा बऱ्याचदा जेवणातील टोमॅटो बाजूला काढून टाकतात. टोमॅटो खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी टोमॅटोपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. टोमॅटोचा सार किंवा कढी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया आंबट तिखट टोमॅटो सार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य - pinterest)
Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार 'ब्रेड पकोडा'
साहित्य:
- टोमॅटो
- लसूण
- लाल तिखट
- हळद
- मीठ
- ओलं खोबर
- कढीपत्ता
- कांदा
- मोहरी
- हिंग
- कोकम
- कोथिंबीर
कृती:
- आंबट तिखट टोमॅटोचा सार बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो धुवून मध्यभागी कापून चार तुकडे करा आणि पाणी घालून शिजवण्यासाठी ठेवा.
- मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, लाल सुक्या मिरच्या, हळद आणि कांदा घालून बारीक पेस्ट बनवून घ्या.
- त्यानंतर शिजवलेले टोमॅटो थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक पेस्ट बनवा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.
- टोपात तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता घाला आणि वरून लाल तिखट, हळद घालून तयार केलेल्या खोबऱ्याचा मसाला घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
- शिजलेल्या मसाल्यात टोमॅटोची पेस्ट आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून मिक्स करा.
- टोमॅटोच्या सारला उकळी येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, कोकम आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला.
- एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून गरमागरम भातासोबत टोमॅटो सार सर्व्ह करा.

