- पारशिवनीतील शेतात जळत्या कचऱ्यात मानवी मृतदेह आढळला.
- मृतदेह अर्धवट जळाल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.
- हत्या, आत्महत्या किंवा अपघात या सर्व शक्यतांवर पोलिसांचा तपास सुरू.
काय घडलं नेमकं?
पारशिवनी परिसरातील एका शेतामध्ये कचऱ्याला आग लागल्याचे समोर आले होते. या जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून अचानक प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे लक्ष तिथे गेले. नागरिकांनी जळत्या कचऱ्याच्या जवळ जाऊन पाहिले तेव्हा तिथे एक मानवी मृतदेह जळत असल्याचे दिसले. हे बघून नागरिकांमध्ये खळबळ उडाली. तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण
या घटनेची माहिती पारशिवनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. कचऱ्यामध्ये हा मृतदेह इतक्या वाईट रीतीने जळाला आहे की, मृत व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे ओळखणेही कठीण झाले आहे. मृत व्यक्तीचे वय ५० ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतेही ओळखपत्र, संशयास्पद साहित्य अथवा पुरावे सापडलेले नाहीत. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुढील टप्प्यात डीएनए तपासणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हत्या आहे की आत्महत्या?
पोलीस आता या घटनेचा तपास करत असून आत्महत्या आहे की हत्या? हत्या असेल तर कोणी केली, या मागचं कारण काय? अश्या सगळ्या बाजूंनी पारशिवनी पोलीस तपास करत आहे. या घटने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आला आहे.

