Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nagpur Crime : जेलमधून सुटताच आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट ; आरोपी पुन्हा तुरुंगात !

Nagpur Crime : जेलमधून सुटताच आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट ; आरोपी पुन्हा तुरुंगात !

Nagpur Crime – अवैध पिस्तूल बाळगल्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला अमीन पटेल (रा. हसनबाग) याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात पाठविले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनला सुमारे चार महिन्यांपूर्वी अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

Nagpur मध्ये सुटकेचा थरार! ८०० विद्यार्थी तीन-चार फूट पाण्यात अडकले; मानवी साखळी करत…, पहा Video

जामिनावर सुटका झाल्यानंतर भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणार नसल्याचे त्याने वैयक्तिक हमीपत्र पोलिसांना दिले होते. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर काही दिवसांतच त्याने सोशल मीडियावर कथितरीत्या भडकावू स्वरूपाचा व्हिडीओ प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. कारवाईत आरोपीच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी केली.

Nagpur : विदर्भ साहित्य संघ आपली जागा परत करणार !

आरोपी पुन्हा तुरुंगात

जेलमधून बाहेर येताच काही दिवसांनी अमनने पुन्हा आकर्षक रील बनवून सोशल मीडियावर टाकली . त्याचे लाईक्स आणि कमेंट्स वाढू लागले . आणि बऱ्या प्रमाणात तो व्हिडीओ सगळीकडे शहरात फिरू लागला . जेव्हा हा सगळा प्रकार नागपूर पोलिसांच्या दृष्टीस पडला तेव्हा त्यांनी त्वरित ऍक्शन घेतली . अमानच्या घरावर धाड टाकली , सगळी शोधाशोध केली . यावेळी मात्र पोलिसांना बंदुकी ऐवजी धारदार चाकू सापडला . याच जोरावर पोलिसांनी अमन ला लगेच बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी तुरुंगात केली . या घटनेने गुंड प्रवृत्तीच्या मुलांच्या मनात एक भीती बसली आणि अमन चे हसू झाल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगतात .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra