Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nagpur Crime News: कन्हान नदीत महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? बेपत्ता मोबाईलमुळे वाढलं गूढ

Nagpur Crime News: कन्हान नदीत महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? बेपत्ता मोबाईलमुळे वाढलं गूढ

  • कन्हान नदीपात्रात अश्विनी उर्फ आशी डे यांचा मृतदेह आढळला.
  • मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसून मोबाईलचा शोध सुरू आहे.
  • कॉल डिटेल्स व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस सखोल तपास करत आहेत.
नागपूर:नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

महिलेचा खबऱ्या मित्रांसोबत वाद

या प्रकरणातील मृत महिलेच नाव अश्विनी उर्फ आशी डे असे आहे. अश्विनीचे कन्हान येथील एका पुरुष मित्रांसोबत वाद सुरु होता. या संदर्भात तिने यापूर्वी पोलिसांत तक्रारही केली होती. तसेच, अमली पदार्थांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये खबऱ्या म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर…

आता यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. अश्विनीचा मृतदेह अपघात की आत्महत्या किंवा अन्य कोणत्या कारणामुळे झाला? याबाबत पोलीस तपास करत आहे. मृत महिलेचा मोबाइलला अद्याप सापडलेला नसून त्याचा देखील शोध घेतला जात आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

जेलमधून सुटताच आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट ; आरोपी पुन्हा तुरुंगात !

अवैध पिस्तूल बाळगल्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला अमीन पटेल (रा. हसनबाग) याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात पाठविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनला सुमारे चार महिन्यांपूर्वी अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

जामिनावर सुटका झाल्यानंतर भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणार नसल्याचे त्याने वैयक्तिक हमीपत्र पोलिसांना दिले होते. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर काही दिवसांतच त्याने सोशल मीडियावर कथितरीत्या भडकावू स्वरूपाचा व्हिडीओ प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. कारवाईत आरोपीच्या ताब्यातून धारदार चाकू जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी केली.

Nashik Crime: कर्ज फेडलं… तरी कोट्यवधींची जमीन विकली? शेतकऱ्याचा गंभीर आरोप; ताबा घेताना पोलिसांशी झटापट

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra