Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा चाकूने सपासप वार

Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा चाकूने सपासप वार

  • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांनी चाकूने हल्ला केला.
  • जखमी आमीन पठाणवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू केला आहे.
नागपूर:नागपूर येथून एक धक्कादायक आणि घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयला वेळेत डिलिव्हरी करण महागात पडलं आहे. त्याच्याच सहकर्मचाऱ्याने मत्सरातून चाकू हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसटी महामंडळ क्वार्टरसमोर उशिरा रात्री ही भीषण घटना घडली.

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या तरुणाचे नाव आमीन मुस्तफा पठाण (३४ वर्ष) असे आहे. तो ऊंटखाना भागात राहतो. आमीन हा ब्लिंकइट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो प्रत्येक ऑर्डर वेळेत पूर्ण करत असल्यामुळे कंपनीत त्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून त्याच्यासोबतच काम करणारे 20 वर्षीय केतन उरकुडे आणि 20 वर्षीय श्रवण बारई हे दोघे त्याच्याशी सतत वाद घालत होते.

२ ऑगस्ट, रविवारी सकाळी दोन्ही आरोपींनी आमीनसोबत वाद घालून त्याला जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती. मात्र त्याच रात्री आमिं जेव्हा मॉडेल मिल चौकात डिलिव्हरी देऊन कंपनीत परतत होता. तेव्हा दोन्ही आरोपींनी त्याचा पाठलाग केला. एसटी महामंडळाच्या क्वार्टरजवळ पोहोचताच आरोपींनी त्याची बाईक अडवली आणि काही समजण्याच्या आतच त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात आमीन गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

बावधन पोलिसांकडून वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात; तब्बल 'इतक्या' दुचाकी जप्त

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. हल्ला केल्यांनतर आरोपी तिथून पसार झाले. उपस्थित स्थानिक नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेत जखमी आमीनला शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस हत्येच्या प्रयत्नांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने आपले सूत्रे हलवून अवघ्या काही तासातच केतन केतन उरकुडे आणि श्रवण बारई या दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

कन्हान नदीत महिलेचा मृतदेह; आत्महत्या की घातपात? बेपत्ता मोबाईलमुळे वाढलं गूढ

नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

पत्नीची हत्या करून मागितली मदत; मित्राने 112 वर काॅल करत पोलिसांसमोर उघड केला संपूर्ण हत्येचा कट

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra