Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
NagpurCity:लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..

NagpurCity:लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..

नागपूर, शहर प्रतिनिधी. विदर्भ हॉकी असोसिएशनने (व्हीएचए) लीज रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देत विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. या आदेशाला स्थगिती देऊन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

तसेच मुख्यमंत्री आणि व्हीएचएचे संरक्षक देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून ऐतिहासिक हॉकी मैदानाचे संरक्षण करावे, अशीही विनंती केली आहे.

Nagpur Crime : एकाच फ्लॅटची दोघांना विक्री ,सव्वा कोटींचा गंडा
व्हीएचएचे समन्वयक कृष्णा जोशी यांनी सांगितले, जिल्हा प्रशासनाने ज्या त्रुटींचा आधार घेत लीज रद्द केली आहे, त्या वस्तुस्थितीला धरून नाही. मैदानावर खेळाडूंसाठी चेंजिंग रूम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. पावसामुळे नव्हे तर नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून मैदानाच्या देखभालीची कामे सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्यावर्षी आंतरशालेय हॉकी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा क्रीडा कार्यालयाने व्हीएचएला प्रशस्तिपत्र आणि आभारपत्र दिले होते. अशा परिस्थितीत त्याच संस्थेविरोधात प्रतिकूल अहवाल दिल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. केवळ कीएचएलाच लक्ष्य केले जात आहे. इतर क्रीडा संस्थांच्या बाबतीत अशी कारवाई केलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Nagpur News: चहाचा घोट ठरला अखेरचा एसटीच्या धडकेत दूधवाहू वाहन उलटले; टपरीवरील एक ठार

असोसिएशनने अपीलमध्ये नुकत्याच झालेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही उल्लेख केला आहे. क्रीडा कोट्याशी संबंधित प्रकरणात क्रीडा संचालनालय आणि संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत निर्णय घ्यावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. १७ जुलैला लीज रद्द करण्याचे आदेशजिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलैला जारी केलेल्या आदेशात व्हीएचएची लीज रद्द करून तहसीलदारांना संबंधित जमिनीचा ताबा घेण्याचे निर्देश दिले आहे. आदेशात लीजच्या अटींचे उल्लंघन, वार्षिक लीज शुल्काच्या भरण्यात झालेली अनियमितता तसेच मैदानावर खेळाडूंसाठी पुरेशा सुविधा नसल्याचा उल्लेख केला आहे. अमरावती रोडवरील सुमारे ३.८ एकर जागा व्हीएचएकडे १९६२ पासून आहे. २००७ मध्ये या जागेची लीज ३० वर्षांसाठी वाढवली होती आणि तिची मुदत २०३७ पर्यंत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra