Dailyhunt
Nana Patekar : तरुणांनाही धड जमत नाही ते केलं वयाच्या 76 व्या वर्षी! 'नाना. तुस्सी ग्रेट हो'

Nana Patekar : तरुणांनाही धड जमत नाही ते केलं वयाच्या 76 व्या वर्षी! 'नाना. तुस्सी ग्रेट हो'

  • रंगभूमीवर दमदार असणारे नाना अगदी व्यायामातही दांडगे आहेत
  • अगदी वयाची 76 गाठलेला व्यक्ती व्यायामशाळेत तरुणांनाही नाही जमत असे ट्रायसेप डिप्स न थकता मारत आहे
  • 76 ओलांडली तरी फिटनेस पहा
अभिनेता नाना पाटेकर तरुणांसाठी नेहमीच एक आदर्श राहिले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी मराठी सिनेरसिकांचे तसेच नाट्यरसिकांची सेवा केली आहे. खासकरून नाना पाटेकरांची मिमिक्री करणारेही अनेक आहेत. अभिनयाच्या या सम्राटाला तरुणाईही पसंत करते. परंतु, नानांनी आता असे एक काम केले आहे जे पाहून तरुणाईही लाजली आहे. रंगभूमीवर दमदार असणारे नाना अगदी व्यायामातही दांडगे आहेत. याचाच एक नमुना सध्या सिनेप्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे.

Rakhi Sawant : राखीची पुन्हा लग्न करण्याची इच्छा! म्हणाली "मी इस्लाम सोडलेला…", मौलानाशी करायचंय लग्न

शेअर करण्यात आली व्हिडीओ :

सुप्रसिद्ध मराठी Photographer अतुल कसबेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर नाना पाटेकरांची पोस्ट शेअर केली आहे. या मध्ये नाना व्यायामशाळेत व्यायाम करताना दिसत आहेत. मुळात, नाना वयाच्या सत्तरीत आहेत. अगदी वयाची 76 गाठलेला व्यक्ती व्यायामशाळेत तरुणांनाही नाही जमत असे ट्रायसेप डिप्स न थकता मारत आहे, हे पाहून खरंच नवल वाटेल. सगळीकडे नाना पाटेकरांचीच चर्चा आहे.

अतुल कसबेकरांनी या भन्नाट पोस्टखाली एक सुबक कॅप्शन दिले आहे. नानांचे कौतुक केले आहे. ते म्हणतात की, ' अहो! नानासाहेब. तुम्ही तर माझे Fitness चे उद्दिष्टच दिले. हे आहेत नाना पाटेकर. वयाची 76 ओलांडली तरी फिटनेस पहा. त्यांनी 15 tricep dips मारल्या आहेत. नानासाहेब तुम्ही Legend आहात.'

Sonali Kulkarni : मानखुर्द पुलावर अडकली अभिनेत्री! 5 तासांपासून एकाच जागेवर स्थिर, म्हणाली "भूक लागलीये पण…"

तरुणांनी भरभरून केली प्रशंसा :

नाना पाटेकरांची कमाल कसरत पाहून त्यांच्या तरुण चाहत्यांनी त्यांना आदर्शच बनवले आहे. तर भरभरून प्रतिसाद दिला आहे. एका नेटकऱ्याने विनोदी भाष्यात म्हंटलं आहे 'उदय भाई अजूनही Fit दिसत आहेत' एका चाहत्याने 'नाना आता तुम्ही माझे आदर्श आहात.' असे कमेंट केले आहे. अशाअनेककौतुकाचीरांगतरुणाईनेलावलीआहे. तसेचनानातुम्हीसोशलमीडियावरसततसक्रियराहण्याचीमागणीतरुणाईनेकेलीआहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra