Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nashik Crime: कर्ज फेडलं. तरी कोट्यवधींची जमीन विकली? शेतकऱ्याचा गंभीर आरोप; ताबा घेताना पोलिसांशी झटापट

Nashik Crime: कर्ज फेडलं. तरी कोट्यवधींची जमीन विकली? शेतकऱ्याचा गंभीर आरोप; ताबा घेताना पोलिसांशी झटापट

  • OTS अंतर्गत कर्ज फेडूनही जमीन विकल्याचा शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप.
  • जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकरी कुटुंबामध्ये झटापट; व्हिडीओ व्हायरल.
  • काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
नाशिक:नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे एका शेतकरी कुटुंबाने बँकेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत संपूर्ण कर्ज फेडूनही बँकेने परस्पर कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांत विकल्याचा दावा करण्यात आला आहे. या जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलीस आणि बँक कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिंडोरी येथील एका शेतकरी कुटुंबावर बँकेचे 7 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज त्यांनी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत पूर्णपणे भरले होते. असे असतानाही बँकेच्या काही स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील सेंट्रल ऑफिसला चुकीची माहिती पुरवली. परस्पर कागदपत्रे तयार केल्याचा आणि स्थानिक एजंटशी संगनमत करून शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये विकल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून केला जात आहे.

पुण्यात घरात घुसून पिता-पुत्रावर चाकूने हल्ला, कानाजवळ अन् दंडावर सपासप वार; कारण काय तर…

पोलिसांची अरेरावी

जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी बँकेचे कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी शेतकरी कुटुंबाने या कारवाईला तीव्र विरोध केला. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये मोठा गोंधळ आणि झटापट झाली. कारवाईदरम्यान पोलिसांनी अरेरावी केल्याचा तसेच मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रित करणाऱ्या एका युवकाला मारहाण केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

न्यायालयाचा आदेश आणि…

दरम्यान, या आरोपांवर पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस पथक घटनास्थळी गेले होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठीच पोलिसांची उपस्थिती होती, असा दावा प्रशासनाने केला आहे.

नाना पटोलेंची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर (X) शेअर करत पोलीस आणि बँक प्रशासनाच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. संपूर्ण कर्ज भरलेलं असताना शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा आणि लाठीहल्ला करणाऱ्या या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Pune Murder Case : 14 जणांच्या टोळक्याकडून तरुणाचा खून; पर्वतीमधील धक्कादायक घटना

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra