Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nashik News : आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर! ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी, नाशिकच्या विकासाला नवे पंख

Nashik News : आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर! ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी, नाशिकच्या विकासाला नवे पंख

  • आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर
  • ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी
  • नाशिकच्या विकासाला नवे पंख

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या बांधकामास नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबतचे मंजुरी पत्र ओझर विमानतळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाले असून, या निर्णयामुळे आता विस्तारीकरणाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. या मंजुरीमुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी हे सर्व काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. विमानतळाचे काम वेळेत पूर्ण झाल्यास कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून नाशिकच्या विकासाला नवी उड्डाणे मिळतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

Nashik News : पावसाळ्यापूर्वी मनपाची धावपळ; शहरातील 211 ठिकाणी पाणी साचण्याचा धोका, मनपा अलर्ट मोडवर

नवे अॅप्रॉन : नवीन विमाने उभी करण्यासाठी अद्ययावत अॅप्रॉनचे बांधकाम.

विद्यमान अॅप्रॉनचा विस्तार : सध्या असलेल्या अॅप्रॉनची क्षमता वाढवणे.

नवीन टॅक्सी वे : सुरक्षित धावपट्टी हालचालींसाठी नवीन टॅक्सी बेची निर्मिती.

विस्तारानंतर प्रवासी क्षमता होणार तीनपट

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा साजरा होत आहे. या काळात देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ओझर विमानतळाचा कायापालट करण्यात येत आहे. राज्य शासनाने या विस्तारीकरणासाठी ५६० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे, या विकासकामांमुळे विमानतळाची सध्याची प्रवासी क्षमता बेट तीनपटीने वाढणार आहे.

सुरक्षेचे कडक नियम आणि अटी

एरोड्रम सल्लागार समितीने या कामाला मंजुरी देताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. कामादरम्यान विमान वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून प्रमाणित कार्य पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. तसेच, दररोजच्या कामाची व विमानांच्या संचालनाची माहिती विमानतळ हवाई वाहतूक सेवेला देणे बंधनकारक केले आहे.

Farmers Protest: 'गिरीष महाजन हटाव', सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra