Dailyhunt
Nasrapur Crime News: छातीवर व्रण, तोंडात बोळा.! नसरापूर प्रकरणातील चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर

Nasrapur Crime News: छातीवर व्रण, तोंडात बोळा.! नसरापूर प्रकरणातील चिमुरडीचा शवविच्छेदन अहवाल समोर

Nasrapur Crime PM Report: पुण्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ६५ वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण पुण्यात संतापाची लाट उसळली आहे..

या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कांबळेची नेहमीच लहान मुलींवर वाईट नजर होती. इतकेच नव्हे तर तो विकृत असल्याचेही पोलीस तापासातून उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मृत मुलीचा (Post Mortem report) शवविच्छेदनाचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

संशयास्पद महिलेला पकडले, चिमुरड्याच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला; दुपारी नेमकं काय घडलं?

पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवालातील माहिती अंगावर अक्षरश: संताप आणणारी आहे. या अहवालावरून नराधम कांबळेने मुलीवर अत्याचार करून तिची किती निर्घृणपणे हत्या केली असेल, हे दिसून येते. नसरापूरमधील पिडीतेच्या शवविच्छेदन अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या अहवालानुसार, अत्याचारावेळी आरोपीने मुलीच्या तोंडात मोजा कोंबला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना त्याने तिच्या तोडांत मोजा कोंबला होता. तिच्या छातीवर मारहाणीचे व्रणही उमटले होते. या अहवालामुळे त्याने चिमुरडीची किती निर्घृण हत्या केली असावी, हे समजून येते.

पुण्यातील शासकीय ससून रुग्णालय प्रशाससनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना सादर केला आहे. या अहवलातील गोष्टी समोर आल्याने आता आणखी संतप्त प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिस सर्व पुराव्यांची जुळवाजुळव करत आहेत. याप्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल होऊन न्यायालयात खटला सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे.

Fake Fertilizer Racket: संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश; २६ लाखांचा साठा जप्त, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक

दरम्यान, मृत मुलगी आपल्या आई-वडिलांसह पुण्यात राहत होती. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ती आपल्या आजोळी नसरापूर येथे गेली होती. १ मे ला अंगणात खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरू द्याखवायला नेतो, असे सांगून तिला आपल्या सोबत नेते आणि तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकराणातील आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही महिला लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या, अशी मागणी करत नवले पुलावर रास्ता रोको आंदोलनही केले. या नंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याचे आश्वासन दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra