Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
NEET Paper Leak: पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! आता थेट 'लष्करा'कडे दिली जाणार प्रश्नपत्रिकांची जबाबदारी?

NEET Paper Leak: पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! आता थेट 'लष्करा'कडे दिली जाणार प्रश्नपत्रिकांची जबाबदारी?

NEET Paper Leak Security : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार परीक्षा प्रणालीला अधिक सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक आणि संरक्षणाची जबाबदारी आर्मीच्या सैन्याला दिले आहे, जणेकरून पेपरफुटीसारख्या प्रकरणांवर बंदी घालता येईल आणि परिक्षांची विश्वसनीयता कायम राखता येईल.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक

नीट परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य संधिया यांच्यासह सीबीएसई (CBSE) आणि एनटीएचे (NTA) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करणे, परीक्षा प्रक्रिया मजबूत करणे आणि भविष्यात होणाऱ्या गैरप्रकारावर निर्बंध निर्माण करणे, यांसारख्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार ‘वन नेशन वन एक्झाम’ मॉडेल कधी लागू करणार?

कोचिंग सेंटरच्या संस्थापकाच्या सीबीआय कोठडीत एका दिवसाची वाढ

तर दुसरीकडे दिल्लीतील एका न्यायालयाने मंगळवारी नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या सीबीआय कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. शिवराज मोटेगावकर हे नीट यूजी परीक्षा २०२६ च्या प्रश्नपत्रिका लीक करणे आणि त्या प्रसारित करण्याच्या प्रकरणात थेट गुंतलेले असल्याने सीबीआयने कोठडीत वाढ केली आहे.

२१ जून रोजी पुन्हा होणार परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) १२ मे रोजी निर्णय घेतला होता की, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेसासाठी ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पेपर लीकच्या आरोपांमुळए रद्द करण्यात आली आहे. आता ही पुन्हा परीक्षा २१ जून रोजी आयोजित केली जाणार आहे.

१२ वीनंतर ऑस्ट्रेलियात कसे मिळवाल मोफत शिक्षण? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच ‘La Trobe University Scholarship’ बद्दल….

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra