Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निसर्गाचा अद्भूत चमत्कार! जंगलात फिरताना दिसला पांढरा हरीण, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! जंगलात फिरताना दिसला पांढरा हरीण, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

  • जंगलात दिसलेल्या एका दुर्मिळ प्राण्याने पर्यटकांसह इंटरनेटवरील लोकांनाही थक्क केले.
  • अनोख्या रंगामुळे हा जीव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
  • वन्यजीव प्रेमींमध्ये उत्सुकता वाढवणाऱ्या या दृश्यामागे निसर्गातील एक खास रहस्य दडलं आहे.
सोशल मिडिया एक असे अनोखे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओजशेअर केले जातात. इथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. कधी थरारक स्टंट्स शेअर केले जातात तर कधी काही असे मिश्किल दृष्य शेअर होतात ज्यांना पाहूनच आपल्या चेहऱ्यावर हसू येईल. इथे फक्त माणसांचेच नाही प्राण्यांचेही अनेक सुंदर दृष्य शेअर होतात. अलिकडे एक आगळ्या-वेगळ्या हरणाचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील आकर्षक गोष्ट हरिण नसून त्याचा वेगळा रंग ठरला आहे. आपण आजवर हलका केशरी आणि चाॅकलेटी रंगाचा हरिण पाहिला आहे पण सध्याच्या व्हिडिओत मात्र एक पांढऱ्या रंगाचा हरिण दिसून आला आहे ज्यांने सर्वांनाच थक्क करुन सोडलं.

तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि हवेतच अडकला बकऱ्याचा जीव, प्राण्याचा आक्रोश अन् Rescue Video Viral

आम्ही तुम्हाला सांगतो की, पांढरा हरिण दिसणे फार दुर्मिळ गोष्ट आहे. हा हरिण आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात दिसून आला. मुख्य म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी स्वत: या अनोख्या हरणाचा व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आनंद व्यक्त केला आणि लिहिले की, 'अशी दुर्मिळ गोष्ट रोज पाहायला मिळत नाही. एका अल्बिनो हॉग डीअरचे दर्शन. @kaziranga_ हे आपल्या वन्यजीवनाच्या समृद्धीचे प्रतीक म्हणून उभे आहे. आसामच्या जंगलांमध्ये अत्यंत दुर्मिळ प्रजातीदेखील टिकून राहाव्यात आणि त्यांचे संवर्धन व्हावे, हा आमचा दृढनिश्चय यातून अधोरेखित होतो'.

व्हिडिओत दिसून आलेला हा हरिण पूर्णपणे पांढऱ्या रंगात नटलेला होता. त्याचे ते लहान काळे डोळे आणि पांढरी शिंगे कुणालाही क्षणात मोहून टाकणारी होती. माहितीनुसार, हरणाचा हा पांढरा रंग अनुवांशिक बदलांमुळे तयार झालेला असतो. भारतामध्ये आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जंगलात दुर्मिळ असे पांढरे हरिण आढळून येतात. त्यांच्या पांढऱ्या रंगामुळे ते जंगलात सहज दिसून येतात पण त्यांचा हाच रंग शिकाऱ्यांपासून लपण्यासाठी त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करतो.

हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

हा व्हिडिओ आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या @himantabiswa नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला १ लाखाहून अधिकचे व्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, "उत्तम! मला तिथे नक्कीच भेट द्यायची आहे. मी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आहे", दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "शांततापूर्ण वातावरण कायम राहिल्यास हे सर्व काही शक्य होते. आपल्या गतिमान नेतृत्वाखाली आम्हाला आपल्या राज्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत. धन्यवाद, सर" आणखीन एका युजरने लिहिले आहे, "हे पांढऱ्या रंगाचे हॉग डीअर (Hog Deer) एखाद्या परीकथेतूनच आल्यासारखे दिसते!".

टीप - हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra