Dailyhunt
Nissan Gravite CNG कडून खुशखबर! ट्विन सिलेंडर रिट्रोफिटमेंट किट बाजारात, आता 7 Seater Mobility शक्य

Nissan Gravite CNG कडून खुशखबर! ट्विन सिलेंडर रिट्रोफिटमेंट किट बाजारात, आता 7 Seater Mobility शक्य

  • सरकारी मान्यताप्राप्त सीएनजी रिट्रोफिटमेंट किट ऑल न्यू निसान ग्रॅव्हाइटसाठी प्रारंभीच्या ८२९९९ रूपयांत उपलब्ध.
  • श्रेणीतील प्रथम ट्विन सिलेंडर सेटअपसोबत (२ X२५) आणि ७ सीटर रचना कायम ठेवणारी ही गाडी जागा, आराम आणि कार्यक्षमता कायम राखते.
  • मोटोझेनकडून विकसन आणि दर्जाची हमी.
Nissan Motor India Private Limited (एनएमआयपीएल) ने ऑल-न्यू Nissan Gravite साठी सरकारमान्य CNG रेट्रोफिटमेंट किट सादर करण्याची घोषणा केली आहे. या किटमध्ये श्रेणीतील पहिल्यांदाच स्मार्ट ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान देण्यात आले असून, त्यामुळे गाडीची ७-सीटर रचना आणि उपयोगिता अबाधित राहते. १६ राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या या किटची सुरुवातीची किंमत ८२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी पुरेशी जागा राखून ही गाडी आरामदायी आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरते.

BMW ची लक्झरी कन्वर्टिबल कार भारतात लाँच; 250 टॉप स्पीड आणि जबरदस्त फीचर्स… किंमत वाचून डोक्याला लावाल हात

ग्रॅव्हाइट CNG हा एक आधुनिक आणि व्यावहारिक पर्याय असून "स्मार्ट पॉवर विथ स्मार्टर सेव्हिंग्ज" ही संकल्पना प्रत्यक्षात आणतो. यामुळे गाडीचा परफॉर्मन्स आणि आराम कायम ठेवत प्रति किलोमीटर खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो. हे CNG किट Motozen यांनी विकसित केले असून गुणवत्ता आणि सुरक्षिततेची खात्री दिली आहे. ग्राहकांना निसानच्या अधिकृत डीलरकडून हे किट सहज बसवता येईल. तसेच किटच्या घटकांवर ३ वर्षे किंवा १,००,००० किमीपर्यंत तृतीय पक्ष वॉरंटी दिली जाते.

निसानचे प्रादेशिक उपाध्यक्ष Thierry Sabbagh यांनी सांगितले की, भारत हा निसानसाठी अत्यंत महत्त्वाचा बाजार असून ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार नव्या आणि परवडणाऱ्या मोबिलिटी सोल्यूशन्स सादर करण्यावर कंपनीचा भर आहे. ग्रॅव्हाइट CNG हा त्याच दिशेने उचललेला महत्त्वाचा टप्पा आहे, जो कुटुंबासाठी जागा, कमी खर्च आणि सोयीस्कर वापर यांचा उत्तम समतोल साधतो.

तर निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक Saurabh Vatsa यांनी सांगितले की, मॅग्नाइट CNGला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता ग्रॅव्हाइटमध्ये ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हे विशेषतः ७-सीटर एमपीव्ही शोधणाऱ्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आले असून, जागा आणि आराम यामध्ये कोणतीही तडजोड केली गेलेली नाही.

या CNG प्रणालीमध्ये BS6.2 अनुरूप सिक्वेन्शियल किट, ICAT-मान्यताप्राप्त सुरक्षा, ८.१ मिमी जाडीचे मजबूत सिलेंडर आणि डायनॅमिक ॲडव्हान्सर तंत्रज्ञान यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच पेट्रोल आणि CNGमध्ये सहज स्विच करता येते, ज्यामुळे वापर अधिक सोयीस्कर होतो.

दैनंदिन प्रवास, शाळा-ऑफिससाठी जाणे किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ग्रॅव्हाइट CNG हा किफायतशीर पर्याय ठरतो. पेट्रोलच्या तुलनेत खर्च कमी असल्यामुळे जास्त वापर करणाऱ्यांसाठी हा फायदेशीर ठरतो. याशिवाय, पर्यावरणपूरक असल्यामुळे शहरी भागात प्रदूषण कमी करण्यासही मदत होते.

Tata Altroz CNG खरेदी करण्याचा विचार करताय? 1 लाख डाउन पेमेंटनंतर किती बसेल EMI, जाणून घ्या हिशोब

ही CNG रेट्रोफिटमेंट किट आजपासून निसानच्या अधिकृत डीलर नेटवर्कद्वारे देशातील १६ राज्यांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra