Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Padmashri Dr. D.Y. Patil: शिक्षणाचा यज्ञ पेटवणारे शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांचे शैक्षणिक कार्य.

Padmashri Dr. D.Y. Patil: शिक्षणाचा यज्ञ पेटवणारे शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांचे शैक्षणिक कार्य.

Dr. D.Y. Patil Educational Work: भारताच्या शैक्षणिक पटलावर आपले नाव सुवर्णक्षरांनी कोरणारे आणि उच्च शिक्षणाचा पाया तळागाळापर्यंत पोहोचवणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात डॉ. डी. वाय.

पाटील यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आज त्यांनी जगाला अखेरचा निरोप दिला असला तरी त्यांचे शैक्षणिक कार्य प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जे अभूतपूर्व कार्य उभे केले, ते आज लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाला केवळ व्यवसाय न मानता, तो एक सामाजिक यज्ञ मानला. त्यांच्या या दूरदृष्टीचा प्रत्यय त्यांनी १९८३ मध्ये स्थापन केलेल्या ‘डी. वाय. पाटील एज्युकेशन ग्रुप’ मधून येतो. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये त्यांनी शिक्षणसंस्थांचे मोठे जाळे पसरवले आहे. पुढे त्यांनी कोल्हापूर येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी केली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासोबतच अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन, वास्तुकला, कायदा आणि दंतचिकित्सा यांसारख्या विविध व्यावसायिक आणि आधुनिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या उत्कृष्ट संस्था त्यांनी सुरू केल्या.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली

त्यांच्या या सर्वसमावेशक शैक्षणिक कार्याचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना झाला. शहरांमध्ये मिळणारी उच्च शिक्षणाची उच्च दर्जाची संधी त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दारात आणून सोडली. अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालये, खेळाची मैदाने आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांनी युक्त अशी संस्था त्यांनी निर्माण केली. त्यांच्या या उत्कृष्ट शैक्षणिक योगदानामुळेच अनेक संस्थांना ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ चा दर्जा प्राप्त झाला आहे.

India Post Recruitment 2026: भारतीय डाक विभागात १० वी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर! कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या सविस्तर

भारत सरकारचा ‘पद्मश्री’ प्राप्त

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेर देखील शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले. त्यांच्या या अमूल्य शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारतर्फे त्यांना मानाचा ‘पद्मश्री’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. आज डॉ. डी. वाय. पाटील यांचे शैक्षणिक कार्य म्हणजे एका वटवृक्षासारखे पसरले आहे, ज्याच्या छत्राखाली लाखो तरुण आपले करिअर घडवून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत.

UGC National Scholarship 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! यूजीसीकडून दोन नवीन राष्ट्रीय स्कॉलरशिप जाहीर, असा घ्या लाभ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra