Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pakistan News : पाकिस्तानात सत्तापालटाची चाहूल? मुनीर-नकवी पॉवर गेमची चर्चा

Pakistan News : पाकिस्तानात सत्तापालटाची चाहूल? मुनीर-नकवी पॉवर गेमची चर्चा

  • शहाबाज आणि जरदारींची वाढली चिंता
  • संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पलटवार केला
Pakistan News : पुन्हा एकदा पाकिस्तानात राजकीय उलथापालथ आणि सत्तापरिवर्तन होण्याचे संकेत मिळत आहेत . देशाच्या गृहमंत्रानी प्रशासकीय तंत्र पूर्णपणे बिघडले असून यामुळे इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे .
या विधानानंतर इस्लामाबाद मध्ये गोंधळ सुरु झाला असून , राजकीय चर्चानां उधाण आलेले आहे . तसेच बऱ्याच जणांच्या मते गृहमंत्र्यांना पाकिस्तानच्या सैन्य प्रमुखांचा मजबूत पाठिंबा असल्याचे देखील बोलले जात आहे . त्याचमुळे गृहमंत्र्यांनी एवढी हिम्मत दाखवत शरीफ आणि जरदारी यांच्या सरकार विरुद्ध दंड थोपटले आहेत .

World News : ११ ऑगस्टला 'स्वातंत्र्य दिन' साजरा करणार ? स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने पाकिस्तानची वाढली चिंता

गृहमंत्री नकवी यांनी मागील २१ वर्षात देशातील जज , नोकरशहा आणि राजकारणी लोकांनी मिळून या देशाची वाट लावली आणि भ्रष्टाचारात सामील होण्याचे गंभीर आरोप देखील लावले . त्यांनी एक शपथ सुद्धा घेतली आहे कि , या भ्र्ष्टाचारात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आपण जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही . राजकीय जाणकारांच्या मते असिफ मुनीर हे नकवी मार्फत देशात एक नवीन सरकार आणू पाहत असल्याचे बोलले जात आहे .

शहाबाज आणि जरदारींची वाढली चिंता

जाणकारांच्या मते मुनीर यांना मुशरफ सारखी एकहाती सत्त्ता आपल्या हातात घ्यायची आहे . आणि त्यासाठीच ते हा डाव टाकत आहेत . आणि त्यांच्या या डावानेच पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांची खुर्ची संकटात आली आहे . तसेच पाकिस्तान सैन्य प्रमुखाला संपूर्ण सत्तेचा मोह होणं हे काही पहिल्यांदा होत आहे , अश्यातला भाग नाही याआधी सुद्धा असे सैन्य प्रमुख सत्ता आपल्या हातात घेऊन देश चालवत असल्याचे जगाने पाहिले आहे . पाकिस्तान मध्ये लोकशाही ही फक्त दिखाव्यापुरती असल्याचे देखील बोलले जाते .

Pakistan News : PoK बंडावर झैद हमीदचा इशारा; भारत PoK ताब्यात घेणार?

संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पलटवार केला

मोहसीन नकवीच्या विधानानंतर खवळलेल्या पाकिस्तानच्या संरक्षक मंत्र्यांनी ख्वाजा असिफ यांनी , नकवी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे . त्यांनी पुढे सांगितले कि गेली ३ वर्ष झाले नकवी हे देशाच्या शक्तिशाली पदावर आहेत . त्यामुळे दे पंतप्रधानांनाही उत्तरदायी नाहीत . त्यामुळे जर एवढा ताकदवर मंत्री माणूस जर खंत व्यक्त करत असेल तर इतर मंत्र्यांनी आता सरळ घरीच गेले पाहिजे . असे व्यंगात्मतक उदगार त्यांनी काढले आहेत .ख्वाजा आसिफ यांनी मंत्रिमंडळ आणि संसदीय अधिवेशनांमधील नक्वी यांच्या मर्यादित सहभागावरही तीव्र टीका केली. नकवी केवळ दोन किंवा तीन मंत्रिमंडळ बैठकांना उपस्थित राहिले, असा दावा त्यांनी केला. आसिफ यांनी नकवी यांना सल्ला दिला की, त्यांनी स्वतःच्या गृह मंत्रालयात आणि पीसीबीमध्ये प्रणाली बदलण्यास सुरुवात करावी, कारण क्रिकेट चाहतेही त्यांच्या कामावर नाराज आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra