- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ हटवल्यानंतर मेटाने व्हीआयपी अकाऊंट्ससाठी नवीन मॉडरेशन नियम लागू केले आहेत.
- आता व्हीआयपी अकाऊंटवरील कोणतीही पोस्ट हटवण्यापूर्वी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी अनिवार्य असेल.
- मेटाने ही चूक एआय-आधारित ऑटोमेटेड मॉडरेशनमुळे झाल्याचे मान्य करून सरकारची माफी मागितली आहे.
सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर
सरकारला दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता कंपनीने व्हिआयपी म्हणजेच प्रसिद्ध व्यक्तींचे अकाऊंट्स हँडल करण्यासाठी नविन नियमांची घोषणा केली आहे. मेटाने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं होतं की, पंंतप्रधान आणि इतर प्रसिद्ध व्यक्तींनी शेअर केलेल्या पोस्ट्स आणि कंटेटची अतिरिक्त छाननी केली जाईल. या कंटेटचे पुनरावलोकन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर केले जाईल. (फोटो सौजन्य: Pinterest)
व्हिआपी अकाऊंट्साठी काय आहे मेटाचे नवीन नियम?
- मेटाने सांगितलं आहे की, व्हिआयपी अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलेला कंटेट केवळ एआयवर सोपवले जाणार नाहीत. याचे व्यक्तिगतरित्या मूल्यांकन केले जाणार आहे.
- कोणत्याही व्हिआयपी व्यक्तिची पोस्ट हटवण्यापूर्वी किंवा रिस्ट्रिक्ट करण्यापूर्वी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याचा आढावा घेतला जाईल.
- नवीन नियमांनुसार, प्रसिद्ध व्यक्तींच्या अकाऊंटवरून कोणतीही पोस्ट हटवण्यापूर्वी किंवा त्यावर निर्बंध घालण्यापूर्वी दोन वरिष्ठ अधिकऱ्यांची मंजूरी असणं अनिवार्य आहे.
व्हिडीओ डिलीट झाल्यानंतर मेटाने दिले स्पष्टिकरण
पंतप्रधान मोदी यांनी शेअर केलेला जनरेशन झेड ला संबोधित करणारा व्हिडीओ डिलीट झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘मेटा’ला स्पष्टिकरण देण्यासाठी बोलावले होते. यावेळी कंपनीच्या भारतातील प्रमुखांनी मेटाच्या वतीने सरकारला सांगितलं की, हे सर्व एआयच्या ऑटोमॅटेड कंटेंड मॉडरेशन टूलमुळे झाले आहे. यामुळे आता अतिरिक्त देखरेख करणार आहे. मेटाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, व्हिआपी आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या पोस्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हटवल्या जाणार नाहीत.

