Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
परदेशातून MBBS केल्यानंतर FMGE पास होण्यासाठी किती वर्षे लागतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

परदेशातून MBBS केल्यानंतर FMGE पास होण्यासाठी किती वर्षे लागतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • परदेशातून MBBS केल्यानंतर भारतात वैद्यकीय व्यवसायासाठी FMGE परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
  • जून 2026 च्या FMGE परीक्षेचा एकूण निकाल फक्त 12.78%
  • वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि अभ्यासक्रमातील फरकामुळे निकालावर परिणाम होत असल्याचे सरकारचे स्पष्टीकरण.
  • FMGE उत्तीर्ण झाल्यानंतरच परदेशी वैद्यकीय पदवीधारकांना भारतात डॉक्टर म्हणून नोंदणी
FMGE 2026: भारतातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया, जॉर्जिया, चीन, फिलिपिन्ससारख्या देशांची निवड करतात. परदेशातून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर भारतात डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी मात्र एक महत्त्वाची परीक्षा द्यावी लागते. हीच परीक्षा म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन(FMGE).. या परीक्षेत यश मिळल्यानंतरच परदेशातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांन भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्याचा मार्ग खुला होतो.

अलीकडेटच संसदेत FMGE च्या निकालाबाबत चर्चा झाली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार,जून 2026मध्ये झालेल्या परीक्षेचा एकूण निकाल फक्त 12.78 इतकाच होता. हा आकडा पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र सरकारने स्पष्ट केले की, प्रत्येक देशातील वैद्यकीय शिक्षणाची पद्धत, अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाची गुणवत्ता वेगवेगळी असल्यामुळे निकालावर त्याचा थेट परिणाम दिसून येतो.

परीक्षा पास होण्यासाठी किती वेळ लागतो?

परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी लगेचच FMGE उत्तीर्ण होतो, असे नाही. काहीजण पहिल्याच प्रयत्नात यश मिळवतात, तर अनेकांना दोन किंवा तीन प्रयत्न करावे लागतात. 2025 च्या डिसेंबर सत्रातील आकडेवारीनुसार, पदवी पूर्ण झाल्यानंतर सहा महिने ते एका वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. या गटातील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या 6 हजारांहून अधिक होती. सहा महिन्यांच्या आतही हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तर काहींना दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागला.

या सत्रात एकूण दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा पास केली. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांतच यश मिळवल्याचे दिसून आले.

जून 2025 मध्ये वेगळे चित्र

डिसेंबर सत्राच्या तुलनेत जून 2025 च्या परीक्षेचे चित्र थोडे वेगळे होते. यावेळी पदवी पूर्ण झाल्यानंतर एक ते दीड वर्षांच्या आत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली. काही विद्यार्थ्यांनी सहा महिन्यांत यश मिळवले, तर अनेकांना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. यामागचे नेमके कारण अधिकृतपणे सांगण्यात आलेले नसले, तरी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, अभ्यासातील खंड आणि तयारीसाठी लागणारा वेळ यामुळे हा फरक पडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कमी निकालामागचं खरं कारण काय?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जून 2026 च्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर रिपीट उमेदवार सहभागी झाले होते. जवळपास 88 टक्के विद्यार्थी हे आधी परीक्षा देऊन पुन्हा प्रयत्न करणारे होते. दुसरीकडे, प्रथमच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल 35 टक्क्यांपेक्षा जास्त होता. त्यामुळे एकूण निकाल कमी दिसत असला तरी पहिल्याच प्रयत्नात अनेक विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

याशिवाय प्रत्येक देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमात मोठा फरक असल्याने विद्यार्थ्यांना भारतीय अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यासाठी अतिरिक्त तयारी करावी लागते.

Journalism Education : जर्मनीत पत्रकार बनायचंय? जाणून घ्या, शैक्षणिक पात्रता, खर्च A to Z माहिती फक्त क्लिकवर

कोणत्या देशांतील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली?

2025 च्या अहवालानुसार, डिसेंबर सत्रात सर्वाधिक यशस्वी उमेदवार रशियातून एमबीबीएस केलेले होते. मात्र उत्तीर्णतेच्या टक्केवारीचा विचार केला, तर जॉर्जियातील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. चीनमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असली, तरी त्यांचा निकाल तुलनेने कमी राहिला. जून 2025 च्या परीक्षेत चीनमधून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी संख्येने सर्वाधिक यश मिळवले. तरीही उत्तीर्णतेची टक्केवारी फारशी वाढली नाही. दुसरीकडे, जॉर्जियाने पुन्हा एकदा सर्वाधिक यशाचा टक्का नोंदवत आघाडी कायम ठेवली.

8 ऑगस्टनंतर शिक्षकांना BLO कामातून मुक्त करा; अनिल बोरनारे यांची सरकारकडे मागणी

परदेशात MBBS करण्यापूर्वी काय लक्षात ठेवावे?

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेताना केवळ कमी शुल्क किंवा सोपा प्रवेश याकडे पाहून चालणार नाही. संबंधित देशातील शिक्षणाचा दर्जा, अभ्यासक्रमाची गुणवत्ता आणि FMGE मधील मागील निकाल यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि सातत्याने तयारी केली तर ही परीक्षा नक्कीच उत्तीर्ण करता येते आणि भारतात डॉक्टर म्हणून करिअरची सुरुवात करता येते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra