- कोटा विभागात वंदे भारत कार्गो रेल्वेची चाचणी सुरू; कमाल वेग ताशी १४५ किमी.
- १६ डब्यांची ही देशातील पहिली वंदे भारत फ्रेट ईएमयू असून महिनाभर विविध तांत्रिक चाचण्या होणार.
- आधुनिक सुरक्षा प्रणाली, स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही आणि अत्याधुनिक ब्रेकिंग तंत्रज्ञानाचा समावेश.
या रेल्वे प्रशासनाने या गाडीसाठी सुमारे एक महिन्यांचा चाचणी कार्यक्रम आखला असून कोटा-नागदा-सवाई माधोपुर रेल्वे मार्गावर विविध वेग, भार आणि परिचालन परिस्थितींमध्ये तिची कसून चाचणी घेतली जाणार आहे. कोटा विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ जैन यांनी सांगितले की, ही देशातील १६ डब्यांची वंदे भारत प्लॅटफॉर्मवर आधारित पहिली फ्रेट ईएमयू प्रोटोटाइप रेक आहे. या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेच्या लॉजिस्टिक्स नेटवर्कमध्ये मोठा बदल अपेक्षित आहे. दररोज किमान दोन फेऱ्यांद्वारे या चाचण्या घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले. या आधुनिक मालवाहतूक रेल्वेची निर्मिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली आहे. पार्सल सेवा अधिक वेगवान, वेळेवर आणि कार्यक्षम करण्यासाठी या रेल्वेची रचना करण्यात आली आहे.
अत्याधुनिक सुरक्षा सुविधा
वंदे भारत फ्रेट ट्रेनमध्ये आधुनिक सुरक्षा आणि तांत्रिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये फोस्र्ल्ड व्हेंटिलेशन प्रणाली. न्यूमॅटिक रिट्रॅक्टेबल रोलर फ्लोअरिंग.
गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…
चाचणीत कोणत्या बाबींची तपासणी ?
- चाचणीदरम्यान रेल्वेच्या विविध तांत्रिक आणि सुरक्षा निकषांची तपासणी केली जाणार आहे.
- १२०, १३०, १४०, आणि १४५ किमी प्रतितास वेगावर धावण्याची क्षमता
- पूर्ण व रिकाम्या भारासह कंपन चाचणी
- आपत्कालीन ब्रेकिंग अंतर
- डब्यांमधील कपलर फोर्सची तपासणी
- वळणावरील ट्रॅकवर कामगिरी
- ट्रॅक्शन, ब्रेकिंग आणि जके चाचण्या
- रिजनरेटिव्ह एनर्जी प्रणाली
- सिग्नल व दूरसंचार प्रणालीशी सुसंगतता
- स्वयंचलित दरवाजे आणि सुरक्षा यंत्रणांची तपासणी
- सीसीटीव्ही, एलईडी लाइटिंग, अंतर्गत प्रणाली आणि शॉर्ट सर्किटविषयक स्थिर चाचण्या

