Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Perfume Side Effects: अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय? मग सावधान! शरीरावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Perfume Side Effects: अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय? मग सावधान! शरीरावर होऊ शकतात 'हे' परिणाम

  • अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय?
  • शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम
  • परफ्यूम वापरताना घ्या ही काळजी
सुगंधी परफ्यूम हा आजकालच्या लाइफस्टाइलचा भाग झाला आहे. स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी परफ्यूमचा वापर केला जातो.
मात्र, प्रत्येक परफ्यूम सर्वांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. विशेषतः सेसिंटिव्ह स्कीन किंवा श्वसनाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींना काही परफ्यूममधील रासायनिक घटकांमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे परफ्यूमचा वापर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. परफ्यूममुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या.

Eating Schedule: सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

त्वचेवर होऊ शकते अॅलर्जी

काही परफ्यूममध्ये असलेले सुगंधी रसायने त्वचेवर लालसरपणा, खाज, जळजळ किंवा पुरळ निर्माण करू शकतात. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी नवीन परफ्यूम वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करून पाहणे अधिक महत्वाचे आहे.

श्वसनाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता

तीव्र सुगंधामुळे काही व्यक्तींना शिंका येणे, नाक बंद होणे, घशात खवखव किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. दमा किंवा अॅलर्जीचा त्रास असलेल्या लोकांमध्ये तीव्र सुगंधामुळे लक्षणे वाढू शकतात.

डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास

काही लोकांना तीव्र सुगंधामुळे डोकेदुखी, मळमळ किंवा चक्कर येण्याचा अनुभव येऊ शकतो. बंद जागेत मोठ्या प्रमाणात परफ्यूमचा वापर केल्यास हा त्रास अधिक जाणवू शकतो.

हानिकारक रासायनिक घटक?

अनेक सुगंधी उत्पादनांमध्ये अस्थिर सेंद्रिय संयुगे (VOCs) आणि इतर रासायनिक घटक असू शकतात. हे घटक प्रत्येक व्यक्तीवर सारखाच परिणाम करतात असे नाही, परंतु संवेदनशील व्यक्तींमध्ये त्रास होण्याची शक्यता वाढू शकते. या घटकांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत अजूनही संशोधन सुरू आहे.

लहान मुलांमध्ये आणि गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी

लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासमोर अतिशय तीव्र सुगंधाचे परफ्यूम वापरणे टाळावे. अशा व्यक्तींमध्ये तीव्र वासामुळे अस्वस्थता, मळमळ, डोकेदुखी किंवा श्वसनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. त्यामुळे सौम्य सुगंधाची प्रोडक्ट्स अधिक सुरक्षित मानले जाते.

परफ्यूम वापरताना घ्या ही काळजी

  • परफ्यूमचा मर्यादित प्रमाणात वापर करा.
  • त्वचेवर अॅलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • डोळे, जखम किंवा अतिसंवेदनशील त्वचेवर परफ्यूम फवारणे टाळा.
  • हवेशीर ठिकाणी परफ्यूम वापरणे अधिक योग्य ठरते.
  • नवीन परफ्यूम वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Girls Fear Lizards: मोठमोठ्या संकटांना न घाबरणाऱ्या मुली पाल पाहताच का किंचाळतात? यामागे आहे 'हे' वैज्ञानिक कारण

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra