Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फक्त चव नाही, पोषणही महत्त्वाचे! मूग, तूर की चणा? प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम, जाणून घ्या

फक्त चव नाही, पोषणही महत्त्वाचे! मूग, तूर की चणा? प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम, जाणून घ्या

  • मूग, तूर की चणा?
  • प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम
  • कोणती डाळ निवडावी?
भारतीय जेवणात डाळ हा केवळ चवीचा भाग नसून उत्तम आरोग्याचा महत्त्वाचा आधार मानला जातो. शाकाहारी आहार घेणाऱ्यांसाठी डाळी प्रथिनांचा प्रमुख स्रोत आहेत.
बाजारात विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध असल्या तरी मूग, तूर आणि चणा डाळ यांचा सर्वाधिक वापर केला जातो. अनेकांना प्रश्न पडतो की, या तिन्हींपैकी सर्वाधिक पौष्टिक आणि प्रथिनांनी समृद्ध डाळ कोणती"https://www.navarashtra.com/topic/diet-plan">आहाराच्या गरजेनुसार डाळ निवडणे अधिक योग्य ठरते.

Anxiety Attack: घाबरणे, धडधड अन् श्वास घ्यायला त्रास? मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करू नका; अशी ओळखा एंग्झायटी अटॅकची लक्षणे

मूग डाळ : हलकी, पचायला सोपी आणि पौष्टिक

मूग डाळ पचनसंस्थेसाठी हलकी मानली जाते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारातून सावरत असलेल्या व्यक्तींसाठी ती उत्तम पर्याय ठरते. यात प्रथिनांसोबतच फायबर, फोलेट, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक सूक्ष्म पोषक घटक असतात. ही डाळ शरीराला ऊर्जा देण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

तूर डाळ : रोजच्या जेवणातील संतुलित पर्याय

तूर डाळ अनेक घरांमध्ये नियमित बनवली जाते. या डाळीत प्रथिने, लोह, पोटॅशियम आणि बी-समूहातील जीवनसत्त्वे आढळतात. नियमित प्रमाणात तिचे सेवन केल्यास स्नायूंच्या कार्याला आधार मिळतो आणि शरीराच्या दैनंदिन पोषणाच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होते.

चना डाळ : प्रथिने आणि फायबरचा उत्तम मिश्रण

चना डाळीत प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारख वाटते. वजन नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तसेच संतुलित आहार घेणाऱ्यांसाठी ही डाळ फायदेशीर मानली जाते. याशिवाय शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळण्यासही मदत होते.

कोणती डाळ निवडावी?

एकाच डाळीला सर्वश्रेष्ठ म्हणणे योग्य नाही. पचनाचा त्रास असल्यास मूग डाळ अधिक उपयुक्त ठरू शकते. रोजच्या आहारासाठी तूर डाळ संतुलित पर्याय आहे, तर अधिक फायबर आणि प्रथिनांची गरज असल्यास चणा डाळ निवडता येते. आहारात या तिन्ही डाळींचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.

निरोगी शरीरासाठी केवळ प्रथिनांचे प्रमाण नव्हे, तर संतुलित पोषणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकाच प्रकारच्या डाळीवर अवलंबून न राहता विविध डाळींचा समतोल आहारात समावेश करा. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली यांच्या मदतीने शरीराला आवश्यक पोषण मिळू शकते आणि दीर्घकाळ चांगले आरोग्य टिकवून ठेवता येते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Fatty liver: फॅटी लिव्हरबाबत जनजागृतीसाठी जसलोक हॉस्पिटलचा पुढाकार; 'लिव्हर फेस्ट सीझन 2' चे आयोजन

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra