Dailyhunt
फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट! तब्बल 200MP कॅमेऱ्यासह Vivo X300 Ultra ची एंट्री, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट! तब्बल 200MP कॅमेऱ्यासह Vivo X300 Ultra ची एंट्री, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

  • चीनमध्ये Vivo X300s आणि X300 Ultra स्मार्टफोन्स लाँच
  • यूजर्सना 2 वर्षांपर्यंत फ्री 200GB क्लाउड स्टोरेज मिळणार
  • Vivo X300 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच LTPO OLED डिस्प्ले
टेक कंपनी विवोने चीनमध्ये Vivo X300s आणि X300 Ultra स्मार्टफोन्सलाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स 200MP कॅमेऱ्याने सुसज्ज आहेत. कंपनीचा X300 Ultra स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 चिपसेटने सुसज्ज आहे. तर Vivo X300s मध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 प्रोसेसर दिला आहे. कंपनीने त्यांचे दोन्ही स्मार्टफोन्स प्रिमियम रेंजमध्ये लाँच केले आहेत.
कंपनीच्या या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेफिकेशन्स जाणून घेऊया.

Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स

Vivo X300 Ultra आणि Vivo X300s ची किंमत आणि उपलब्धता

Vivo X300 Ultra स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये 12GB + 256GB या बेस व्हेरिअंटसाठी CNY 6,999 म्हणजेच सुमारे 95,900 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,02,700 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 1,09,600 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 8,999 म्हणजेच सुमारे 1,23,300 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - X)

Vivo X300s च्या 12GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,999 म्हणजेच सुमारे 68,500 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 75,400 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 82,200 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 95,900 रुपये आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यूजर्सना 2 वर्षांपर्यंत फ्री 200GB क्लाउड स्टोरेज ऑफर केले जाणार आहे. ही ऑफर 5 मे पर्यंत हे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे. विवो एक्स 300 अल्ट्रा स्मार्टफोन फिल्म ग्रीन, सिल्व्हर टोन आणि ब्लॅक रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. विवो एक्स 300 एस स्मार्टफोन फिल्म ग्रीन, ड्रीम कोअर पर्पल आणि सिल्व्हर रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Vivo X300 Ultra चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Vivo X300 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.82-इंच LTPO OLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. विवोच्या या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 चिपसेट दिला आहे. ग्राफीक्स सपोर्टसाठी फोनमध्ये अ‍ॅड्रेनो 840 जीपीयू दिला आहे. विवोचं असं म्हणणं आहे की, हा स्मार्टफोन 16 जीबीपर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑफर करणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीन ओएस 6 वर चालतो.

Vivo X300 Ultra मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 200-मेगापिक्सलचा आहे. ज्याची फोकल लेंथ 35mm आहे. तसेच फोनमध्ये 200 मेगापिक्सलेचा पेरिस्कोपिक टेलीफोटो शूटर आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल लेंस दिला आहे. यासोबतच सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Vivo X300 Ultra स्मार्टफोन कंपनीच्या "Big Gun" 400 टेलीकन्वर्टरला देखील सपोर्ट करतो. जे 400mm फोकल लेंथ, 200-मेगापिक्सेल ऑप्टिकल आउटपुट आणि 17.4x ऑप्टिकल झूमसह प्रगत स्थिरीकरण आणि वेगवान ऑटोफोकसला समर्थन देते. हा कॅमेरा 160mm पर्यंत झूम लेवल ऑफर करतो. विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये 5G आणि 4G नेटवर्कसह वाय-फाय, वाय-फाय डायरेक्ट, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट हे कनेक्टिविटी पर्याय दिले आहेत. फोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

Vivo X300s स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Vivo X300s स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच 1.5K (2800×1260 pixels) ऐमोलेड फ्लॅट डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 प्रोसेसर, एआरएम जी1-अल्ट्रा जीपीयू आणि विवोची व्ही3+ ब्लूप्रिंट इमेजिंग चिप आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो.

Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! 'हा' लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, Vivo X300s मध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) ला सपोर्ट करतो. यासोबतच 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस आणि 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. हा फोन 3एक्स ऑप्टिकल झूम आणि 100 एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Vivo X300s स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,100mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 4जी, वाई-फाई 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी कनेक्टिविटी फीचर्स दिले आहेत. फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरफ्रिंटचा सपोर्ट दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra