Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल दोन कोटी 64 लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल दोन कोटी 64 लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने अमली पदार्थ विरोधी मोहिमेला अधिक तीव्र करत एक मोठे पाऊल उचलले आहे. पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेला तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७९० रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पूर्णपणे नष्ट केला आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही काळात अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत दाखल झालेल्या एकूण १५६ गुन्ह्यांमध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. नष्ट करण्यात आलेल्या एकूण ३१५ किलो वजनाच्या साठ्यामध्ये अंमली पदार्थांचा समावेश होता. त्यामध्ये ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), १२ किलो अफूची झाडे, ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर, १०९ किलो डोडा (पोस्तचे दाणे/टरफले)

रांजणगाव येथे पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जप्त केलेला हा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या थेट देखरेखीखाली गुरुवारी (३० जून) रांजणगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’च्या प्रकल्पात हा सर्व साठा पर्यावरणपूरक पद्धतीने शास्त्रोक्त रीतीने जाळून नष्ट करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : श्रीरामपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एका रात्रीत दोघांच्या आवळल्या मुसक्या

विविध शासकीय विभागांची उपस्थिती

ही संपूर्ण विल्हेवाट प्रक्रिया भारत सरकार, महाराष्ट्र शासन, गुन्हे अन्वेषण विभाग तसेच अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून पार पाडण्यात आली. या संवेदनशील प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकृत प्रतिनिधी व वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra