Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी

णेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान विसर्जनानंतर बाहेर काढण्यात येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीची योग्य आणि नियोजनबद्ध करण्यासाठी मुंबईमहापालिकेने एक कृती आराखडा आखला आहे.

उत्सवाच्या काळात विसर्जनानंतर या मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर पडून राहू नयेत आणि त्यांचे सुव्यवस्थित व्यवस्थापन व्हावे, यासाठी प्रत्येक वॉर्ड स्तरावर एका निश्चित जागी पालिकेकडून स्वतंत्र शेड उभारले जाणार आहे. मुंबईतील चौपाट्या, नैसर्गिक विसर्जनस्थळे तसेच कृत्रिम तलावांमधून बाहेर काढण्यात येणाऱ्या पीओपी मूर्ती संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून गोळा करून या नियोजित शेडमध्ये सुरक्षित ठेवण्यात येतील, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.(फोटो सौजन्य - istock)

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

उत्सवाच्या काळात गोळा होणाऱ्या मूर्तीच्या प्रमाणाचा अंदाज घेतला असता, मागील वर्षी ३० ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर मूर्तीचे संकलन करण्यात आले होते. या कालावधीत गणेशोत्सवामध्ये ५११ वाहनांच्या फेऱ्यांमधून तब्बल २ हजार ४८६.७६ टन वजनाच्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. यामध्ये १ सप्टेंबर रोजी १०४ वाहनांमधून ३९७.८१ टन, ३ सप्टेंबर रोजी सर्वाधिक १०७ वाहनांमधून ५४८.९७ टन, तर ७ सप्टेंबर रोजी ९३ वाहनांमधून ४३४.२९ टन मूर्ती संकलित करण्यात आल्या होत्या.

नवरात्रोत्सवात ३ ते १० ऑक्टोबरदरम्यान ५१ वाहनांमधून ३१५.७१ टन मूर्ती जमा झाल्या, ज्यामध्ये ४ ऑक्टोबर रोजी १९ वाहनांमधून ८६.८२ टन आणि ६ ऑक्टोबर रोजी आठ वाहनांमधून ९४.४४ टन मूर्तींचा समावेश होता. दोन्ही उत्सवांची मिळून ५६२ वाहनांच्या माध्यमातून एकूण २ हजार ८०२.४७ टन मूर्ती महापालिकेने गोळा केल्या होत्या. यंदाही याच धर्तीवर संकलन मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाणार असून, या सर्व मूर्ती एकाच ठिकाणी साठवण्यासाठी शेड उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे.

Dahi Handi 2026: साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून 'विसर'?

पीओपीच्या मूर्ती पर्यावरणासाठी न मिळाल्यामुळे आता पालिकेने थेट घातक ठरत असल्याने त्यांची केवळ साठवणूक करून बेट विल्हेवाट लावण्याऐवजी त्यांच्या पुनर्वापराच्या शक्यताही महापालिका तपासून पाहत आहे. यापूर्वी स्टार्टअप्सच्या मदतीने पीओपी पुनर्वापराचे प्रयोग करण्यात आले होते, परंतु त्यांना अपेक्षित यश पीओपी आणि जिप्सम उत्पादनाशी संबंधित औद्योगिक कंपन्यांशी संपर्क साधला आहे. या प्रक्रियेवर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नसले, तरी पुनर्वापराचा ठोस आणि व्यवहार्य मार्ग शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra