Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PKBS vs LSG Live Updates: Connolly - प्रियांशच्या झंझावातात 'नवाब' झुकले, गोलंदाजीचा निर्णय चुकणार? 'पंत'सेना गपगार

PKBS vs LSG Live Updates: Connolly - प्रियांशच्या झंझावातात 'नवाब' झुकले, गोलंदाजीचा निर्णय चुकणार? 'पंत'सेना गपगार

  • लखनौला पंजाबच्या टीमने सळो की पळो करून सोडले
  • पंजाबच्या टीमने दिले धावांचे आव्हान
  • प्रियांश आणि कूपरच्या जोडीचा झंझावात
आयपीएल २०२६मध्ये, फॉर्मात असलेला पंजाब किंग्स संघ रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रंगला.
हा सामना पंजाबमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या हंगामात, ५ पैकी ४ सामने जिंकून पंजाब ८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर, लखनौ संघ ५ सामन्यांतून केवळ २ विजय मिळवून आठव्या क्रमांकावर आहे. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. पहिली विकेट गेल्यानंतर ऋषभचा हा निर्णय योग्य वाटला होता. पण लखनौच्या संघासाठी हा आनंद जास्त काळ टिकला नाही.

प्रभसिमरन सिंगच्या रूपाने पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला. मोहम्मद शमीने त्याला पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले. मात्र कूपर कॉनली आणि प्रियांशने लखनौच्या बॉलर्सना अक्षरशः रडकुंडीला आणले. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी कमालीची खेळी केली.

PBKS vs LSG Live Score: लखनौने जिंकली नाणेफेक, पंजाब करणार पहिले फटकेबाजी; बॅटिंगचा निर्णय

बनवला नवा रेकॉर्ड

दुसऱ्या विकेट्ससाठी कूपर कॉनली आणि प्रियांश आर्य यांनी नवा रेकॉर्ड बनवला आहे. दोघानीही शतक झळकवत कमालीचे प्रदर्शन केले. १३ व्या षटकातच दोघांनी १७३ पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासात ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. तो २०२४ च्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका षटकात सहा षटकार मारल्यानंतर आणि आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ४२ चेंडूंमध्ये १०३ धावा केल्यानंतर प्रियांश आर्य प्रकाशझोतात आला होता. तर कमी वयात उत्तम कामगिरी करण्यासाठी कूपर कॉनलीचे नाव घेतले जात आहे. कॉनलीने ४६ बॉल्समध्ये ८७ धावांची खेळी करत पंजाबसाठी चांगली सुरूवात करून दिली. प्रियांशने केवळ ३६ बॉल्समध्ये ९३ धावा केल्या आणि १४ व्या षटकात कॅचआऊट झाला. दोघांनीही सेल्फलेस खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.

मधेच गती झाली कमी

श्रेयस अय्यरच्या रूपाने पंजाब किंग्सची चौथी विकेट पडली. पंजाबने अचानक तीन विकेट गमावल्या. प्रियांश आर्य ९३ धावांवर, तर कूपर कॉनेली ८७ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार कर्णधार श्रेयस अय्यर ५ धावांवर बाद झाला आणि वढेरादेखील केवळ १३ धावा काढून बाद झाला. यानंतर पंजाबच्या धावगतीचा वेग थोडा मंदावला. तरीही पुढील खेळाडूंनी २५० च्या धावांचा टप्पा पार करत पंजाबला चांगली धावसंख्या उभारून दिली. स्टॉयनिसनेदेखील टीमला धावसंख्या उभारून देण्यास हातभार लावला.

PBKS vs LSG Head To Head: पंजाबचा विजयरथ रोखणार का लखनौ? IPL मध्ये असा आहे दोन्ही टीमचा रेकॉर्ड

लखनौसमोर धावांचं लक्ष्य

लखनौने नाणेफेक जिंकूनही चुकीचा निर्णय घेतला तर नाही ना? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. कारण पंजाबने लखनौला मोठं लक्ष्य दिलं आहे. हे लक्ष्य आता लखनौ २० ओव्हर्समध्ये पूर्ण करू शकणार की नाही हेच पाहावं लागणार आहे. RCB चा रेकॉर्ड तोडत जिंकण्यासाठी पंजाबने तब्बल २५५ धावांचं लक्ष्य दिलंय. याआधी २५० रन्स करण्याचा रेकॉर्ड हा या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या नावे होता, जो आता पंजाबच्या नावे झालाय.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra