- पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी
- ऑनलाइन थ्रेट मिळाल्याने खळबळ
- मेलबर्न पोलिसांकडून तपास सुरु
ऑनलाइन धमकीने खळबळ
पंतप्रधान मोदी ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियादौऱ्यात विविध द्विपक्षीय बैठका करणार आहे. याच वेळी ते मेलबर्न येथ मार्व्हल स्टेडियममध्ये आयोजित मेलबर्न मीट्स मोदी या कार्यक्रमात सहभागी होतील. येथे ते ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. परंतु या कार्यक्रमापूर्वीच ऑनलाइन धमकीच्या इशारा देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या मेलबर्नमधील स्थानिक पोलिस आणि ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ही धमकी कोणी दिली याचा तपास सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकवरील अबू मुस्तफा नावाच्या अकाउंटवरुन हा थ्रेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रचाराशी संबंधित एका पोस्टरवर आक्षेपार्ह टिप्पणी करत संबंधित व्यक्तीने धमकी दिली असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेचा तपास सुरु
ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिस या घटनेचा तपास करत असून संबंधित सोशल मीडिया पोस्टचा IP ॲड्रेस शोधण्यात आला आहे. ही पोस्ट नेमकी कोणी केली, याचा हेतू काय होता आणि यामध्ये कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाले आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच धमकी देण्याऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे आणि त्याचा शोध घेण्याचेही कार्य सुरु आहे.
या ऑनलाइन धमकीनंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया फेडरल पोलिस, स्थानिक पोलिस आणि विशेष सुरक्षा पथकांनी संयुक्तपणे कडक बंदोस्ताची तयारी केली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा सोशल मीडियावरील हालचालींवर बारकाईन नजर ठेवून आहे. तसेच या धमकीमुळे कोणताही कार्यक्रम रद्द करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळाली आहे.

