Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PMC Health News: खासगी रुग्णालयांतील बेडची माहिती आता एका क्लिकवर; पीएमसीचा रिअल-टाइम डॅशबोर्ड येणार

PMC Health News: खासगी रुग्णालयांतील बेडची माहिती आता एका क्लिकवर; पीएमसीचा रिअल-टाइम डॅशबोर्ड येणार

Pune Health News: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्सची रिअल-टाइम माहिती देणारा ऑनलाइन डॅशबोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील दोन महिन्यांत हा डिजिटल प्लॅटफॉर्म कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तत्काळ बेड उपलब्धतेची माहिती मिळणार असून, रुग्णालयात दाखल होण्यातील विलंब कमी होण्यास मदत होईल.

अलीकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी खासगी रुग्णालयांमध्ये, विशेषतः अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णांना दाखल नाकारले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर या समस्येवर तंत्रज्ञानाधारित उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Ratnagiri Crime: रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह

प्रस्तावित डॅशबोर्डमध्ये सुरुवातीला शहरातील १८० खासगी रुग्णालये आणि २० महानगरपालिका मातृत्वगृहे समाविष्ट केली जाणार आहेत. या सर्व ठिकाणांवरील बेड स्थितीची अद्ययावत माहिती प्रणालीवर उपलब्ध असेल. रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती मोबाईलवर तसेच रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवरील डिजिटल डिस्प्लेवर पाहता येणार आहे.

कोविड काळात वापरण्यात आलेल्या बेड व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर ही यंत्रणा विकसित केली जाणार आहे. आरोग्य विभागाकडे कर्मचारी संख्येची मर्यादा असल्याने प्रत्येक तक्रारीची पडताळणी करणे कठीण होत असल्यामुळे तंत्रज्ञानाधारित मॉनिटरिंग सिस्टम आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Weather Update : '६ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस अन् वादळी…', रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यां

या योजनेअंतर्गत रुग्णालयांना दररोज किंवा आवश्यकतेनुसार बेड उपलब्धतेची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक राहणार आहे. विशेषतः आयसीयू, सामान्य उपचार बेड आणि मातृत्व सेवा बेड यांची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, पुढील दोन आठवड्यांत महापालिका अधिकारी शहरातील प्रमुख रुग्णालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन कार्यपद्धती, तांत्रिक निकष आणि नियामक चौकट अंतिम करणार आहेत. त्यानंतर आयटी विभाग प्लॅटफॉर्म विकसित करून दोन महिन्यांत तो नागरिकांसाठी उपलब्ध करून देईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra