Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

  • प्रेमसंबंधातील वाढत्या मतभेदांमुळे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने बंगळुरू हादरले आहे.
  • विश्वासाच्या नावाखाली आखलेल्या एका प्लॅनने तरुणाच्या आयुष्याचा भीषण शेवट घडवला.
  • पोलिस तपासात समोर आलेल्या काही तपशीलांमुळे या प्रकरणाने सोशल मिडियावर मोठी चर्चा रंगवली आहे.
कर्नाटकातील बंगळूरतमंगळवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने प्रियकराच्या हत्येचा फुल प्रुफ प्लॅन बनवला आणि निर्दयपणे जिवंत जाळतच त्याची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य म्हणजे महिलेने या घटनेचा व्हिडिओ देखील आपल्या फोनमध्ये कैद करुन ठेवला आहे. घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Pune Nasrapur Case : नसरापूर प्रकरणाला वेग! 15 दिवसांत चार्जशीट, 28 दिवसांत भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव प्रेरणा (27) आहे, ती एका टेलीकॉम स्टोरमध्ये काम करते. प्रेरणा तिचा प्रियकर किरणसोबत (27) मागील एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होती. मागील काही काळापासून दोघांमध्ये मतभेद होत होते. प्रेरणाची तक्रार होती की किरण तिला दुर्लक्ष करत होता. लग्नालाही त्याचा नकार होता. याच गोष्टीवरुन राग धरत प्रेरणाने प्रियकर किरणच्या हत्येचा कट रचला.

घरी बोलावून केली हत्या

मंगळवारी प्रेरणाने किरणला दुपारच्या सुमारास आपल्या घरी बोलवून घेतले. घरी प्रेरणा एकटीच होती. काहीवेळ गप्पा मारल्यानंतर तिने अचानक किरणच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि खुर्चीवर बसवून ती त्याचे हात पाय बांधू लागली. जेव्हा किरणने या गोष्टीचा विरोध केला तेव्हा प्रेरणाने याला विदेशी प्रपोजलचे कारण सांगितले. प्रेरणाने आधीच घरी पेट्रोल आणि केरोसिन आणून ठेवले होते. तिने ते प्रियकराच्या अंगावर ओतले आणि आग लावत त्याला जिवंतच जाळून टाकले. माहितीनुसार, तिने ही घटना तिच्या फोनच्या कॅमेरातही कैद करुन घेतली.

सोशल मिडिया क्रिएटरने संपवलं आयुष्य, 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या स्वयंपाकघरात घेतला गळफास

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात महिलेने प्रियकराला जाळून मारल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी या गोष्टीवरुन नाराज होती की प्रियकर तिला इग्नोर करत आहे. घटना बंगळूरच्या बिदरहल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनानगर परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरु आहे. किरणच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यानंतरच घटनेची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra