Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Prashant Kishor Net Worth: नवनिर्वाचित आमदार प्रशांत किशोर यांच्याकडे गडगंज मालमत्ता? पत्नीच्या नावावरही कोटींची संपत्ती ?

Prashant Kishor Net Worth: नवनिर्वाचित आमदार प्रशांत किशोर यांच्याकडे गडगंज मालमत्ता? पत्नीच्या नावावरही कोटींची संपत्ती ?

  • प्रशांत किशोर यांच्याकडे गडगंज मालमत्ता?
  • पत्नीच्या नावावरही कोटींची संपत्ती ?
  • किती आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे संपत्ती?
Prashant Kishor Net Worth: राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे.
त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा दारुण पराभव केला आहे. या विजयानंतर प्रशांत किशोर यांचे राजकीय यश, तसेच त्यांची संपत्ती ( Prashant Kishor Net Worth ) हा चर्चेचा विषय बनला आहे. नवनिर्वाचित आमदाराची एकूण संपत्ती किती आहे याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेल तर त्यांच्याकडे किती संपत्ती आहे सगळं जाणून घेऊयात.

PBPartners Brand : पीबीपार्टनर्सने लाँच केला अधिकृत ब्रँड मॅस्कॉट 'बीमा सिंग'! विमा सल्लागारांना मिळणार मोठे पाठबळ

निवडणूक लढण्यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रशांत किशोर यांची एकूण मालमत्ता ९६.०६ कोटी रुपये आहे, तर त्यांच्या पत्नी डॉ. जान्हवी दास यांची मालमत्ता १०१.९३ कोटी रुपये इतकी संपत्ती असल्याचं नमुद आहे.

बहुतेक संपत्ती कशाशी निगडीत?

प्रशांत किशोर यांची बहुतेक संपत्ती सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमधील गुंतवणुकीशी निगडित आहे. यामध्ये वेदास व्हेंचर्समधील त्यांच्या १००% हिस्सेदारीचा समावेश आहे, ज्याचे मूल्य ९५.२६ कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि बँक ठेवींसह त्यांची ८ कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता देखील आहे.

प्रशांत किशोर यांची गुंतवणूक

प्रशांत किशोर यांच्या गुंतवणुकीमध्ये ₹७.३६ कोटींच्या एफडींचा समावेश आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या एचडीएफसी बँकेत अनेक एफडी आहेत, ज्या सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक मानल्या जातात.

कोणत्या वित्तीय साधनांचा समावेश?

प्रशांत किशोर यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एफडी, इक्विटी, बॉण्ड्स आणि इतर वित्तीय साधनांचाही समावेश आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पाटणा येथील पाटलीपुत्र कॉलनी, गाझियाबाद आणि नवी दिल्ली येथील वसंत विहार येथे त्यांच्या निवासी मालमत्ता आहेत. त्यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य ₹७३.८७ कोटी आहे, तर त्यांच्या पत्नीच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ₹१२.४२ कोटी आहे.

राजकीय पार्श्वभूमी

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या तीन दशकांपासून भाजपचा मजबूत गड मानला जातो. 1995 पासून या जागेवर भाजपने सातत्याने विजय मिळवला आहे. प्रथम नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नवीन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, नितीन नवीन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल केवळ एका जागेपुरता मर्यादित न राहता बिहारच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.

Gig Economy : नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 'गिग वर्क' बनणार रोजगाराचे सर्वात मोठे माध्यम; इतर नोकऱ्यांपेक्षा कमाई 2.5 पट

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra