Dailyhunt
Pratap Sarnaik : भाईंदरपाडा जमीनीचा वाद चिघळला; सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने, विहंग ग्रुपकडून मेहतांना 'Cease & Desist' नोटीस

Pratap Sarnaik : भाईंदरपाडा जमीनीचा वाद चिघळला; सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने, विहंग ग्रुपकडून मेहतांना 'Cease & Desist' नोटीस

  • भाईंदरपाडा जमीनीचा वाद चिघळला;
  • सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने,
  • विहंग ग्रुपकडून मेहतांना 'Cease & Desist' नोटीस
भाईंदर/ विजय काते : भाईंदरपाडा येथील जमीन वाद पुन्हा एकदा चिघळला असून या प्रकरणात विहंग ग्रुपकडून आमदार नरेंद्र मेहता यांना 'Cease & Desist' नोटीस बजावण्यात आली आहे.
या नोटीसनंतर राजकीय वादाला अधिकच धार आली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार मालिका सुरू झाली आहे. नोटीसांबाबत प्रतिक्रिया देताना आमदार नरेंद्र मेहता यांनी ठाम भूमिका घेत, "अशा नोटिसांना मी भिक घालत नाही. मी जे आरोप केले आहेत, तेच आरोप फिर्यादीने पोलिसांकडे तक्रारीत नोंदवले आहेत. मग पोलिसांना ही नोटीस पाठवणार का, याचा खुलासा करावा," असे आव्हान दिले. तसेच, "या नोटीसला कायदेशीर उत्तर दिले जाईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर पलटवार करत गंभीर आरोप केले. "आरटीओमध्ये भ्रष्टाचार करून प्रताप सरनाईक मीरा-भाईंदर शहरात फाईव्ह स्टार हॉटेल उभारत आहेत," असा आरोप त्यांनी केला. या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.दरम्यान, प्रताप सरनाईक यांनीही मेहता यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. "नरेंद्र मेहता हे स्वतः दर्जाहीन नेते आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामुळे राजकारणाचा स्तर खालावत आहे. आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही, म्हणूनच त्यांना नोटीस पाठवली आहे," असे सरनाईक यांनी म्हटले.

नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांची निवड, 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व

पुढे ते म्हणाले, "ठाण्यात त्यांना कोणीही भीक घातलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ते निवडून येतात. स्वतःच भ्रष्टाचारात गुंतलेले असताना इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे."या संपूर्ण प्रकरणामुळे भाईंदरपाडा जमीन वाद पुन्हा चर्चेत आला असून पुढील काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान प्रत्यक्षात सत्य काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra