Dailyhunt
Pune Accident : पुण्यात खासगी बसचा थरार; अधी दोन महिलांना धडक दिली अन् थेट.

Pune Accident : पुण्यात खासगी बसचा थरार; अधी दोन महिलांना धडक दिली अन् थेट.

पुणे : बाजीराव रस्त्यावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भल्या पहाटे अपघाताचा थरार घडला आहे. अभिनव चौक मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स एका दुचाकीला धडकून नंतर एका इमारतीला जाऊन धडकली. यामध्ये दुचाकीस्वार मायलेकी जखमी झाल्या आहेत.

ही घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक किरण रामभाऊ कचरे (वय ४२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, अनुराधा पत्की आणि सुचित्रा पत्की या दोघी जखमी झाल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, कचरे स्वारगेटकडून अभिनव चौकातून पुढे जात होता. ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले आणि नंतर ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोन महिलांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक आणि सकाळच्या वेळी व्यायामासाठी बाहेर पडलेले लोक मदतीसाठी धावले. खडक पोलिसांच्या मदतीने जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, या धडकेत अत्रे सभागृहाजवळील लोखंडी रेलिंगचेही मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा : आरटीई प्रवेशासाठी 40 हजारांची लाच, खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले

गेल्या काही दिवसाखाली मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील एका महिलेसह दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविंद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेद्र संपत काकडे( वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख ( वय ३०, रा. अँमेनोरा हडपसर पुणे. मुळ रा. नेहापुजा कोऑपरेटीव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव वेस्ट मुबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजाराम काकडे (वय ४०, रा पांगारे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra