Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

  • वाघोलीत मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी 12 तासांत साताऱ्यातून अटक केली.
  • तांत्रिक विश्लेषण आणि विशेष तपास पथकाच्या मदतीने आरोपीचा अचूक मागोवा घेण्यात आला.
  • किरकोळ वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुणे:पुण्यातील वाघोली परिसरात मित्राच्या खुनानंतर फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 12 तासांत जेरबंद करण्यात वाघोली पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण, वेगवान तपास आणि अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी साताऱ्यात छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. किरकोळ वादातून घडलेल्या या खुनाचा अल्पावधीत उलगडा झाल्याने वाघोली पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईचे कौतुक होत आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव सूरज साव (वय 35, रा. भालुका, जि. नाडीया, पश्चिम बंगाल) असे आहे. त्याच्यावर मित्र शिवशंकर सिंह यांची हत्या केल्याचा आरोप आहे. मृत शिवशंकर सिंह आणि आरोपी सूरज साव हे दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. कामानिमित्त ते एकाच खोलीत राहत होते. दरम्यान, दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचा राग आरोपीने मनात धरला आणि त्यातूनच त्याने मित्र शिवशंकर सिंह यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी 1 जुलै रोजी वाघोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी हा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याने तो राज्याबाहेर पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.

सातारा येथील आदर्शदीप नगर परिसरातील एका बांधकाम प्रकल्पावर छापा टाकला. तेथे लपून बसलेल्या सूरज साव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक करण्यात आल्याने या खुनाच्या गुन्ह्याचा जलद उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीची शिफ्ट सुरू असताना एका कंपनीतील कामगारासोबत सहकाऱ्याने केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कॉम्प्रेसरच्या उच्च दाबाच्या पाईपमुळे गंभीर दुखापत झाल्याने ४२ वर्षीय कामगाराचा जीव गेला असून, या घटनेने औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अनिस बाबा बनून आसिफ देत होता गुंगारा; मुंबईतील रेड लाईट परिसरातून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra