Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

पुणे : राज्यासह जगभरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी कोथरूड, नांदेड सिटी तसेच बाणेर भागातील तीन ज्येष्ठ नागरिकांची वेगवेगळ्या घटनेत १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरूद्ध आयटी अॅक्ट तसेच फसवणूकीप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोथरूड भागातील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. १९ जून रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. गॅस बिल थकीत असून, ते न भरल्यास गॅस पुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. चोरट्यांनी त्यांना एपीके फाईल पाठविली. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ४२ हजार रुपये काढून घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कारोटे तपास करत आहेत.

तर, दुसऱ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकाची पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने ४ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना बँकेकडून पेन्शन कार्ड देण्यात येणार आहे, अशी बतावणी करुन त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी बँक खात्यातून पैसे काढून दुसऱ्या खात्यात वर्ग केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

तसेच, बाणेरमधील ज्येष्ठ नागरिकाची एपीके फाईल पाठवून ५ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केली. सायब चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठविली होती. ही फाईल उघडताच चोरट्यांनी खात्यातून पैसे काढून घेतले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक खिलारे तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra