Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune Murder Case : 14 जणांच्या टोळक्याकडून तरुणाचा खून; पर्वतीमधील धक्कादायक घटना

Pune Murder Case : 14 जणांच्या टोळक्याकडून तरुणाचा खून; पर्वतीमधील धक्कादायक घटना

पुणे : पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून १४ जणांच्या टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सिंहगड रोड परिसरातील पानमळा येथे घडला आहे.

याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, तर पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शुभम राजू घोडके (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याचा मेहुणा विष्णू शिवाजी शिरसाठ (वय २२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अर्जुन कांबळे, अनिकेत कांबळे, गणेश कदम, मुंकुद राजगुरू आणि अंकुश काळे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वृंदावन नर्सरीजवळील पानमळा परिसरात घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम घोडके हा वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्तीमध्ये राहत होता. तो एका कार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला होता. घटनेच्या दिवशी शुभम हा तक्रारदार विष्णू शिरसाठ यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी जात होता. त्यावेळी आरोपी परत येताना त्यांची नजर शुभमवर पडली. 'हा पठारावरचा आहे, मारा याला,' असे म्हणत आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. १४ जणांच्या टोळक्याने शुभमला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शुभमचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. तसेच पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक महाले करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्यात चोट्यांचा उच्छाद, भोरमधील 'स्वप्नलोक सोसायटी'तील 5 बंद घरे फोडली; तब्बल…

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार

रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करणाऱ्या मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, साथीदाराविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका मजुराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रकाश राजेंद्र जाधव (वय ३३), नीलेश उद्धव गुरव (वय ३५, दोघे रा. माऊली काॅलनी, काळेपडळ, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra