Thursday, 22 Jul, 3.18 pm नवराष्ट्र

होम
पुणे | राजेश लाडवर दौंड आणि पाटस पोलिस चौकीत खंडणीचे गुन्हे दाखल

    पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथील खंडणीबहाद्दर आणि तोतया सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणारा राजेश पांडुरंग लाड याच्यावर दौंड पोलीस स्टेशनला एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी अटक केली होती. असे असतानाच आता या खंडणी बहाद्दावर बुधवारी (दि.२१) दौंड पंचायत समितीच्या बांधकाम शाखा अभियता यांना दहा लाखांची खंडणी मागितली. तर पाटस येथील एका ट्रॅक्टर व्यावसायिकास २० हजार रुपये खंडणी स्वरुपात मागत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पाटस पोलीस चौकीत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. तुम्हाला मुरूम, माती उपसा करून वाहतूक करायची, मग मला पैसे द्या नाही तर मी तुम्हाला मारून टाकीन, अशी धमकी देत पाटस येथील स्वयंघोषित आणि तोतया सामाजिक कार्यकर्ता राजेश पांडुरंग लाड याने अष्टविनायक रोडचे कामावर मुरूम वाहतूक करणाऱ्या एका ठेकेदारास एक लाख रूपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी दौंड पोलीसांनी मंगळवारी (दि.20) राजेश लाड याला अटक केले होते. त्यानंतर बुधवारी (दि.21) दौंड पंचायत समितीचे बांधकाम शाखा अभियंता जितेंद्र बलभीम शिंदे (रा. गोपाळवाडी ता.दौंड जि.पुणे ) यांनी पाटस पोलीस चौकीत राजेश लाड यांनी जीवे मारण्याची धमकी देत पाच ते दहा लाख रुपये खंडणी स्वरूपात मागितल्याची तक्रार दिली आहे.

    शाखा अभियंता शिंदे यांच्या देखरेखेखाली तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील एकूण ३० गावांमधील रस्ते व पूल व इतर शासकीय बांधकामे चालू असतात. मागील दोन वर्षापासून राजेश पांडुरंग लाड हा चालू असलेल्या रस्त्याची, पुलाची व सरकारी बांधकामे ही कामे निकृष्ट दर्जाची आहेत. अशा प्रकारचे माहितीच्या अधिकारात तक्रार अर्ज करीत आहे. हे अर्ज निकाली काढण्यासाठी पैशांची मागणी करीत असे. गेले दोन वर्षांपासून म्हणजेच 2019 पासून वेळोवेळी त्याने माझ्या विरुद्ध शासकीय कामांचे संदर्भाने माहितीच्या अधिकारात तक्रार अर्ज करून पैशाची मागणी करून पैसे दिले नाही तुझ्याकडे बघून घेतो, तुझे हात पाय मोडून ठेवतो, अशी धमकी देऊन आतापर्यंत चार वेळा पंचवीस हजार आणि दोन वेळा पाच हजार असे एकूण एक लाख दहा हजार रुपये खंडणी स्वरूपात घेतले आहेत.

    त्यानंतर मागील पंधरा दिवसापूर्वी त्याने पाटस जिल्हा परिषद गटातील शासकीय निधीतून चालू असणारी व पुर्ण झालेल्या रस्त्याची, पुलाची बांधकामे या कामांची माहितीच्या अधिकारात माहिती मिळावी, अशी मागणी केली. ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत त्या कामाची चौकशी व्हावी. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे अर्ज केला आहे. एक लाख रुपये दिले तर मी माहिती अधिकारात माहितीचा पाठपुरावा करणार नाही, हा अर्ज मागे घेतो. मंगळवारी ( दि. 20 ) शिंदे हे शासकीय कामा निमित्त पाटस ग्रामपंचायत येथे आले असता. लाड याने शिंदे यांना पाटस टोल नाक्याजवळील अंबिका हॉटेलमध्ये बोलवून तुमची जिल्हा परिषद येथे माहिती अधिकारात माहिती मागवली आहे. अर्ज माघारी घ्यायचा असेल तर आता माझी भूक वाढलेली आहे, आता तुम्ही मला पाच ते दहा लाख रुपये द्या. मी अर्ज मागे घेतो , 2 ऑगस्टच्या आत पैसे नाही दिले तर मी माझ्या मार्गाने तुमच्यावर कारवाई करील अशी धमकी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top