Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; तपास माळेगाव पोलिसांकडे

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; तपास माळेगाव पोलिसांकडे

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश प्रतापराव जगताप यांनी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी मोठी खळबळ उडाली होती.

जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याशी तरुणीचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्यांनी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, त्याने पत्नीशी घटस्फोट घेणार असल्याचे खोटे कागदपत्र पीडित तरुणीला दाखवले, त्यानंतर लग्नासाठी महाबळेश्वर मध्ये रिसॉर्ट बुक केले होते, मात्र प्रत्यक्षात पीडित तरुणीशी संपर्क तोडला. त्यामुळे पीडित तरुणीने जिल्हा परिषदेमध्ये येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान संबंधित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन कदम यांनी याबाबत पत्रकारांना ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा : सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून २०१२ ते २०२६ दरम्यान पीडित तरुणीशी शरीर संबंध निर्माण केले. तिची आठ ते दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक देखील जगताप याने केली. पीडित तरुणीने पुणे येथील रुग्णालयात दाखल असताना पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली, मात्र घटनास्थळ बारामती तालुक्यातील असल्याने पुणे पोलिसांनी सदर फिर्याद माळेगाव पोलीस ठाण्यात वर्ग केली. त्यानुसार माळेगाव पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास माळेगाव पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन घटना

पुण्यात तीन संतापजनक घटना घडल्या आहेत. नांदेड सिटी आणि काळेपडळ पोलिस ठाण्यांत महिलांच्या छळाचे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणांत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणे, माहेराहून पैसे, फर्निचर व दागिने आणण्यासाठी दबाव टाकणे, मानसिक छळ करणे तसेच तिहेरी तलाक उच्चारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra