Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणेरी स्ट्रायकर्सचा 'धडाका'! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय

पुणेरी स्ट्रायकर्सचा 'धडाका'! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय

  • पुणेरी स्ट्रायकर्स क्लबचा दुसरा विजय
  • डीएसपी कप मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धा
  • रमाकांत शिंदे अन् निखिल गावडेची शानदार कामगिरी
पुणे: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित डीएसपी कप मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली.
वाघोली येथील पुणे क्रिकेटक्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात रमाकांत शिंदे(5-10) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल रिव्हेंजर्स संघाने प्लॅटिनम क्रिकेट क्लब संघाचा 67 धावांनी पराभव करत पहिला विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत निखिल गावडे(47धावा) याने केलेल्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर पुणेरी स्ट्रायकर्स क्लब संघाने फिअरलेस फायटर्स संघाचा 42 धावांनी पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:

रॉयल रिव्हेंजर्स: 20षटकात 5बाद 188धावा(उमेश वणवे 36(28,5×4,1×6), विवेक शिवाराम नाबाद 32(16, 7×4), मयूर पाटील 31(18,1×4,4×6), उद्धव गायकवाड 32(20,3×4,2×6), शोएब सौदागर 25, विकास नेहे 2-28, आभास त्यागी 2-29) वि.वि.प्लॅटिनम क्रिकेट क्लब: 16.5षटकात सर्वबाद 121धावा(मोहित 42(23,9×4), चिराग जगताप 17, ओंकार गायकवाड 15, रमाकांत शिंदे 5-10, प्रणित जहांगीर 2-15); सामनावीर – रमाकांत शिंदे; रॉयल रिव्हेंजर्स संघ 67 धावांनी विजयी;

पुणेरी स्ट्रायकर्स क्लब: 20षटकात 7बाद 186धावा(निखिल जी 47(18,6×4,3×6), आदेश उपाध्याय 36(33,5×4), ऋतुराज तावरे 32(21,6×4), प्रसाद देवकाते 35(19,1×4,2×6), इब्राहिम नाबाद 18, आशिष 3-26, नवीन आंबरोसे 2-37) वि.वि.फिअरलेस फायटर्स: 18.5षटकात सर्वबाद 144धावा(प्रसाद जावळे 37(22,5×4,2×6), दीपक गिरी 37(28,3×4,2×6), संदीप 3-17, सुयश खेडकर 2-27); सामनावीर – निखिल जी; पुणेरी स्ट्रायकर्स क्लब 42 धावांनी विजयी.

डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या सौजन्याने आयोजित 'डीएसपी करंडक मान्सून लीग' मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत पुणेरी स्ट्रायकर्स क्लब आणि कॉर्पोरेट क्रशर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.
वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पुणेरी स्ट्रायकर्स क्लबने प्लॅटिनम क्रिकेट क्लबचा ४६ धावांनी पराभव केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra