Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल.

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल.

पुणे : बसप्रवासात आणि बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर हात साफ करण्याच्या घटना कात्रज आणि स्वारगेट परिसरात घडल्या. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या, दागिने आणि रोकड असा सुमारे एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बसप्रवासात दोन सोन्याच्या बांगड्या लंपास

कात्रज परिसरात बसमधून प्रवास करणाऱ्या ६० वर्षीय महिलेच्या हातातील ५० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या चोरट्याने लंपास केल्या. याबाबत भोसरी-आळंदी रस्ता भागात राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला १७ मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास मोरेबाग बसथांबा, कात्रज परिसरातून त्या बसने प्रवास करीत होत्या. बसमध्ये गर्दी होती. याचा फायदा घेत चोरट्याने दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.

बसथांब्यावर पर्स चोरून दागिने, रोकड लंपास

कात्रज चौकातील पीएमपीएमएल बसथांब्यावर महिलेच्या बॅगमधील पर्स चोरून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ६० हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. त्रिमूर्ती चौक कात्रज भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ३० जुलै रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील बसथांब्यावर ही घटना घडली. चोरट्याने महिलेच्या बॅगेतील पांढऱ्या रंगाची पर्स चोरली. त्यात सोन्याचे घंटन, चांदीच्या कानातील रिंगा आणि रोकड होती.

हे सुद्धा वाचा : अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी CJP ची कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक; धर्मेंद्र प्रधानांनंतर आता लागणार गडकरींचा नंबर?

बसध्ये चढताना ज्येष्ठ महिलेची बांगडी लंपास

स्वारगेट येथे बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत ७२ वर्षीय महिलेच्या हातातील १२ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केली. याबाबत ७२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला ३० जुलै रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्या स्वारगेटहून भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra