Dailyhunt
Rahul Roy चा भयंकर डाऊनफॉल! कुठे गेले 'अच्छे दिन', कंटेट क्रिएटरसोबत भयानक व्हिडिओ व्हायरल, अखेर सोडले मौन

Rahul Roy चा भयंकर डाऊनफॉल! कुठे गेले 'अच्छे दिन', कंटेट क्रिएटरसोबत भयानक व्हिडिओ व्हायरल, अखेर सोडले मौन

  • राहुल रॉयवर काय आली ही परिस्थिती?
  • लोकांनी केले ट्रोल
  • व्हायरल रीलवर राहुलने सोडले मौन
तुम्ही जरी 'Gen Z' असाल, तरी तुम्ही १९९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट 'आशिकी' आणि त्याच्या देशव्यापी क्रेझबद्दल ऐकले असेलच.
या चित्रपटानेमुख्य कलाकार, राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांना रातोरात स्टार बनवले होते. त्यातील जॅकेट सीन इतका अविस्मरणीय होता की, अनेक वर्षांनंतर त्याच्या सिक्वेलमध्ये तो पुन्हा तयार करण्यात आला आणि त्याची गाणी आजही चहाच्या दुकानांमध्ये आणि लहान शहरांच्या टपऱ्यांवर ऐकू येतात. पण राहुल रॉय अचानक प्रकाशझोता आला आहे तेदेखील चुकीच्या कारणामुळे. त्याच्या अशा अचानक दिसण्याने लोकांनाही धक्का बसला आहे.

राहुल रॉयचा स्टारडम अल्पकाळ टिकला. 'आशिकी'ची जादू पुन्हा निर्माण करण्यात अयशस्वी ठरल्याने, राहुल रॉय आणि अनु अग्रवाल दोघेही हळूहळू प्रसिद्धीच्या झोतातून नाहीसा झाले. नोव्हेंबर २०२० मध्ये, राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला, ज्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणावर चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले. तेव्हापासून तो प्रसिद्धीपासून दूर राहिला आहे, अधूनमधून सोशल मीडियावर त्याच्या कार्यक्रमांचे फोटो आणि अपडेट्स शेअर करत असतो. पण त्याच्या नवीन ऑनलाइन अवताराने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. हा अभिनेता अलीकडेच काही अज्ञात इंटरनेट क्रिएटर्ससोबत रील्स बनवताना दिसला आणि नेटकऱ्यांना हे आवडलेले नाही. यामुळे त्याला खूपच ट्रोल करण्यात आले आहे.

350 चित्रपटांचा तगडा अनुभव, BR चोप्रांच्या 'महाभारत' मधून 'शिखंडी'ही गाजला, तरीही म्हणतोय 'मी अ‍ॅक्टर नाही…'

राहुल रॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला

डॉ. वनिता घाडगे नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्तीने राहुल रॉयचे काही रील्स अपलोड केले आहेत, ज्यामध्ये ते दोघे 'आशिकी' आणि 'फिर तेरी कहानी याद आयी' यांसारख्या त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांवर नाचताना दिसत आहेत. हे खूपच विचित्र दिसत असून, लोक खूपच वाईटरित्या यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका रीलमध्ये, ती राहुलसोबत पोज देते आहे आणि 'तेरे डर पे सनम' या गाण्यावर लिप-सिंक करते, तर राहुल फ्रेममध्ये भावशून्य उभा राहिलेला दिसून येत आहे. इतर रील्ससुद्धा काही फारशा चांगल्या नाहीत; प्रत्येक रीलमधून तीच विचित्र, अस्वस्थ करणारी ऊर्जा जाणवते, जी खूपच खटकते. जर तुम्ही ९० च्या दशकात 'आशिकी'ची क्रेझ पाहिली असेल, जर तुम्हाला राहुल रॉयची क्रेझ आठवत असेल, तर या रील्स पाहण्याने तुम्हाला अंगावर शिसारी येईल.

राहुलने सोडले मौन

राहुलने याबाबत आपले मन सोशल मीडियावर व्यक्त करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. राहुल म्हणतो की, 'मी माझं काम प्रामाणिकपणे आणि नम्रपणे करतो. मला काही कायदेशीर बाबींसाठी पैसे द्यावे लागतात, आणि हे आजचे नाहीत, हे मला ब्रेन स्ट्रोक होण्यापूर्वीच्या काळातील आहेत. जर तुम्ही माझ्या साधेपणावरून किंवा माझ्या समस्यांवरून माझी चेष्टा करत असाल, तर ते माझ्यापेक्षा तुमच्याबद्दलच जास्त व्यक्त होत आहे. जर तुम्हाला खरंच इतकी काळजी वाटत असेल, तर मला एक चांगली, कायदेशीर नोकरी शोधायला मदत करा, जेणेकरून मी माझ्या खटल्यांचे पैसे भरू शकेन. निदान मी माझ्या मेहनतीने कमावतोय, दुसऱ्यांची चेष्टा करून नाही आणि माझ्या ब्रेन स्ट्रोकनंतर, सक्रिय राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला आयुष्यभर काम करायचं आहे. त्यामुळे माझं मन सक्रिय राहतं आणि मी अजूनही काम करत आहे ही जबाबदारीची जाणीव मला मिळते. यामुळे मला कधीतरी त्रास होऊ शकतो, पण तुम्ही मला तोडू शकत नाही.'

या त्याच्या व्यक्त होण्यानंतर जगण्यासाठी खरंच राहुल रॉयची कोणी मदत करू शकणार का? किंवा नक्की त्याच्यावर काय परिस्थिती उद्भवली आहे हे कोणी जाणून घेणार का हा प्रश्न उरतोच. या घटनेनंतर पुन्हा एकदा स्टारडमच्या या काळ्या दुनियेचं कटू सत्य बाहेर आलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra